व्हॉट्सअॅपवर चुकून मेसेज सेंड झाला? आता चिंता करु नका!

व्हॉट्सअॅप लवकरच रिकॉल फीचरची अपडेट जारी करणार आहे. यामुळे तुम्हाला सेंड झालेला मेसेज सेंड करता येईल.

By: | Last Updated: > Wednesday, 13 September 2017 8:35 PM
Whats App to introduce unsent feature soon says reports

मुंबई : व्हॉट्सअॅप वापरताना एखाद्या ग्रुपवर किंवा पर्सनल चॅटवर चुकून मेसेज सेंड झाल्याचा अनुभव तुम्हाला अनेकदा आला असेल. मात्र व्हॉट्सअॅपने अखेर ते फीचर आणण्याची तयारी सुरु केली आहे, ज्याची प्रतीक्षा गेल्या कित्येक दिवसांपासून युझर्सना होती.

व्हॉट्सअॅप लवकरच रिकॉल फीचरची अपडेट जारी करणार आहे. यामुळे तुम्हाला सेंड झालेला मेसेज अनसेंड करता येईल. ‘व्हॉट्सअॅप बीटा इन्फो’च्या वृत्तानुसार लवकरच ‘आयओएस’साठी हे फीचर दिलं जाणार आहे. ज्यामुळे युझर्स सेंड झालेले मेसेजही डिलीट करु शकतील.

या फीचरमुळे डिलीट होण्यासोबत मेसेज नोटिफिकेशन सेंटरमधूनही गायब होतील. हे फीचर येणार असल्याचं वृत्त अनेकदा समोर आलं आहे. मात्र आता अनसेंड नावाने हे फीचर येणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.

व्हॉट्सअॅप सध्या या फीचरवर काम करत असून पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. लवकरच हे फीचर युझर्ससाठीही जारी केलं जाईल, असं ‘व्हॉट्सअॅप बीटा इन्फो’ने म्हटलं आहे. व्हॉट्सअॅप बीटा इन्फो हे व्हॉट्सअॅपचं अधिकृत ट्विटर हँडल नाही. मात्र या ट्विटर हँडलद्वारे व्हॉट्सअॅप फीचर्सबाबत लीक रिपोर्ट दिले जातात.

‘इंडिपेंडंट’च्या वृत्तानुसार व्हॉट्सअॅपचं अनसेंड फीचर केवळ पाच मिनिटांसाठी असेल. म्हणजे तुम्ही मेसेज सेंड करुन पाच मिनिट पूर्ण झाले असतील तर तुम्हाला तो मेसेज डिलीट करता येणार नाही. हे फीचर फोटो आणि GIF साठीही काम करणार आहे.

Technology News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Whats App to introduce unsent feature soon says reports
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

देशविरोधी ट्वीट, केंद्राकडून 115 अकाऊंट बंद करण्याचे आदेश
देशविरोधी ट्वीट, केंद्राकडून 115 अकाऊंट बंद करण्याचे आदेश

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ट्विटरला विश्वसनीय माहिती प्रसिद्ध

फेसबुकचा राजा, एबीपी माझा! राज्यात नंबर वन, तर देशात सहावा
फेसबुकचा राजा, एबीपी माझा! राज्यात नंबर वन, तर देशात सहावा

मुंबई : फेसबुकवर सर्वाधिक व्हिडिओ पाहिल्या जाणाऱ्या पेजमध्ये

Samsung Anniversary Sale: सॅमसंगच्या अनेक स्मार्टफोनवर घसघशीत सूट
Samsung Anniversary Sale: सॅमसंगच्या अनेक स्मार्टफोनवर घसघशीत सूट

मुंबई : स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास आता एक सुवर्णसंधी आहे. कारण

दररोज 4GB डेटा, एअरटेलचा नवा प्लॅन
दररोज 4GB डेटा, एअरटेलचा नवा प्लॅन

मुंबई : देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेलने प्रीपेड

IMEI नंबरशी छेडछाड केल्यास आता तीन वर्षांचा तुरुंगवास
IMEI नंबरशी छेडछाड केल्यास आता तीन वर्षांचा तुरुंगवास

नवी दिल्ली : मोबाईलच्या आयएमईआय (आंतरराष्ट्रीय मोबाईल उपकरण ओळख)

असुसचा हा फोन आणखी दोन हजार रुपयांनी स्वस्त!
असुसचा हा फोन आणखी दोन हजार रुपयांनी स्वस्त!

मुंबई : असुसने लोकप्रिय स्मार्टफोन Zenfone 3 Max 5.5 (ZC553KL) च्या किंमतीत कपात

33 रुपयात 1 GB डेटा आणि व्हॉईस कॉलिंग, आरकॉमचा नवा प्लॅन
33 रुपयात 1 GB डेटा आणि व्हॉईस कॉलिंग, आरकॉमचा नवा प्लॅन

मुंबई : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनने 33 रुपयांच्या

बनावट बातम्या रोखण्यासाठी आता फेसबुकचाच पुढाकार!
बनावट बातम्या रोखण्यासाठी आता फेसबुकचाच पुढाकार!

मुंबई : फेसबुकने बनावट बातम्या रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शिवाय

2 दिवसात 10 लाख स्मार्टफोनची विक्री, शाओमीचा विक्रम
2 दिवसात 10 लाख स्मार्टफोनची विक्री, शाओमीचा विक्रम

मुंबई : शाओमीला फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज या सेलचा मोठा फायदा

‘त्या’ सहा बँकांच्या कार्ड वापरास बंदी संदर्भातील वृत्ताचं IRCTC कडून खंडन
‘त्या’ सहा बँकांच्या कार्ड वापरास बंदी संदर्भातील वृत्ताचं IRCTC कडून...

नवी दिल्ली : इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टूरिझम कॉरपोरेशन (IRCTC) ने SBI