31 डिसेंबरनंतर या मोबाईलवर व्हॉट्सअॅप बंद होणार!

31 डिसेंबरनंतर म्हणजे नव्या वर्षात व्हॉट्सअॅप वापरायचं असेल, तर कंपनीने लिस्ट केलेले फोन बदलावे लागणार आहेत.

31 डिसेंबरनंतर या मोबाईलवर व्हॉट्सअॅप बंद होणार!

मुंबई : व्हॉट्सअॅप या वर्षाअखेर काही फोनवर काम करणं बंद करणार आहे. आऊटडेटेज व्हर्जनला व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही, असं कंपनीने एका ब्लॉगद्वारे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे 31 डिसेंबरनंतर म्हणजे नव्या वर्षात व्हॉट्सअॅप वापरायचं असेल, तर कंपनीने लिस्ट केलेले फोन बदलावे लागणार आहेत.

या फोनमध्ये ब्लॅकबेरी ओएस, ब्लॅकबेरी 10, विंडोज फोन 8.0 आणि जुन्या व्हर्जनचा समावेश आहे, ज्यामध्ये व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही. आऊटडेटेड व्हर्जनला व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही, असं कंपनीने यापूर्वी 2016 मध्येही जाहीर केलं होतं. मात्र ती डेडलाईन नंतर 30 जून 2017 पर्यंत वाढवण्यात आली होती आणि पुन्हा एकदा वाढवण्यात आलेली 31 डिसेंबरची डेडलाईनही संपणार आहे.

हा निर्णय कंपनीसाठी कठोर आहे. मात्र व्हॉट्सअॅपचा आणखी चांगला अनुभव देण्यासाठी ही अपडेट देणं गरजेचं असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. तुम्ही हे फोन वापरत असाल तर लवकरात लवकर अपडेटेड व्हर्जनचे फोन घ्या, असंही व्हॉट्सअॅपने म्हटलं आहे.

या फोनवर व्हॉट्सअॅप चालणार नाही

  • नोकिया सिम्बियन S60

  • ब्लॅकबेरी ओएस आणि ब्लॅकबेरी 10

  • विंडोज फोन 8.0 आणि यापेक्षा जुने व्हर्जन्स

  • नोकिया S40

  • अँड्रॉईड 2.3.7 आणि यापेक्षा जुने व्हर्जन्स

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV