व्हॉट्सअॅप बंद झाल्याने ट्विटरवर 'लोड'!

व्हॉटअसअॅप बंद झाल्याचे मेसेज सर्वात आधी ट्विटरवर पाहायला मिळाले.

व्हॉट्सअॅप बंद झाल्याने ट्विटरवर 'लोड'!

मुंबई: जगभरात तासाभरासाठी व्हॉटअसअॅप ठप्प झाल्यामुळे मेसेज जाणे- येणे बंद झालं. अनेकांना व्हॉट्सअॅप बंद आहे हे कळलंही नाही. तसंच अनेकांनी स्वत:च्या नेटवर्कमध्ये अडचणी असतील असा तर्क लावला. पण ट्विटर आणि सोशल मीडियावर अनेकांनी याबाबतचे मेसेज केल्यानंतर, जगभरात व्हॉटअसअॅप क्रॅश झाल्याचं समोर आलं.

ट्विटरवर टॉप ट्रेण्ड

व्हॉटअसअॅप बंद झाल्याचे मेसेज सर्वात आधी ट्विटरवर पाहायला मिळाले. अनेकांनी तर व्हॉटअसअॅप खरंच बंद झालंय का हे चेक करण्यासाठी मेसेज करुन पाहण्याऐवजी, ट्विटर लॉग इन करुन पाहिलं.

दुसरीकडे ट्विटरवरील वाढत्या मेसेजमुळेच आणि जगभरातून व्हॉटअसअॅप बंद असल्याचे मेसेज येऊ लागल्याने, ट्विटरवर #whatsappdown हा टॉप ट्रेण्ड पाहायला मिळाला.

हा हॅशटॅग वापरुन अनेकांनी व्हॉटअसअॅप बंद असल्याची माहिती दिली. अनेकांनी व्हॉटअसअॅप बंद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जोक्सवर जोक्स ट्विट केले.

जगभरात व्हॉटअसअॅप ठप्प

लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉटअसअॅप आज दुपारी तासभरासाठी ठप्प झालं. दुपारी दीड ते अडीच या तासभरासाठी व्हॉट्सअॅप बंद झाल्याने, मेसेज सेंड-रिसिव्ह करणं बंद झालं.

तासाभराच्या काळानंतर व्हॉट्सअॅप पुन्हा सुरु झालं. मात्र व्हॉट्सअॅप का बंद झालं होतं, तांत्रिक बिघाड नेमका काय होता, हे अजून कळू शकलेलं नाही.

संबंधित बातम्या

Whatsapp down: तासाभरासाठी व्हॉट्सअॅप जगभरात ठप्प 

व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यानंतर सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: whatsapp down top trend on twitter
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV