वोडाफोनकडून आज 2जीबी फ्री डेटा, महिला दिनानिमित्त खास ऑफर

वोडाफोनकडून आज 2जीबी फ्री डेटा, महिला दिनानिमित्त खास ऑफर

नवी दिल्ली: जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून व्होडाफोननं दिल्ली-एनसीआरमधील महिला यूजर्संसाठी एक नवी ऑफर सुरु केली आहे. वोडाफोन रेड पोस्टपेड प्लान महिला यूजर्ससाठी आज तब्बल 2जीबी डेटा फ्री देणार आहे.

यूजर्सना याची माहिती एका मेसेजमधून मिळणार आहे. दिल्ली-एनसीआरमधील वोडाफोन रेड पोस्टपेड प्लान यूर्जसना या ऑफरचा फायदा मिळणार आहे.

वोडाफोन इंडियाचे बिझनेस हेड आलोक वर्मानं सांगितलं की, 'आमच्यासाठी महिला यूजर्संही महत्वाच्या आहेत. त्यामुळे महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललं आहे. त्या आपल्या जीवनात आणखी यश मिळवत राहोत.'
दरम्यान, जिओला टक्कर देण्यासाठी वोडाफोननं नवा टेरिफ प्लान आणला आहे. यामध्ये यूजर्सला 346 रुपयात महिनाभर 1 जीबी 4जी डेटा दररोज आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे.

संबंधित बातम्या:

व्होडाफोनचा 346 रुपयात दररोज 1 जीबी 4G डेटा

Airtel Surprise offer : 13 मार्चपासून एअरटेल मोफत डेटा देणार!

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV