16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, शाओमीचे दोन शानदार फोन लाँच

सेल्फी चाहत्यांची आवड लक्षात घेऊन शाओमीनं भारतात Redmi Y1, आणि Redmi Y1 Lite हे दोन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत.

16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, शाओमीचे दोन शानदार फोन लाँच

मुंबई : सेल्फी चाहत्यांची आवड लक्षात घेऊन शाओमीनं भारतात Redmi Y1, आणि  Redmi Y1 Lite हे दोन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. रेडमी Y1च्या 3 जीबी+32 जीबी मेमरी व्हेरिएंटची किंमत 8,999 रुपये आणि 4 जीबी +64 जीबी मेमरी व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे.

रेडमी Y1 लाइटची किंमत फक्त 6,999 रुपये आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 8 नोव्हेंबरपासून mi.com आणि अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. याशिवाय ऑफलाइन रिटेल स्टोअरमधूनही हा स्मार्टफोन खरेदी करता येईल.

शाओमी रेडमी Y1 स्मार्टफोनचे फीचर :

शाओमी रेडमी Y1 स्मार्टफोनमध्ये 5.5 इंच स्क्रीन देण्यात आली असून याचं रेझ्युलेशन 720x1280 पिक्सल आहे. याशिवाय याला गोरील्ला ग्लास प्रोटेक्शनही असणार आहे. यामध्ये ऑक्टोकोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 435 आणि 3 जीबी / 4 जीबी रॅम व्हेरिएंटही आहेत.

या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यामध्ये तब्बल 16  मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर रिअर कॅमेरा 13 मेगापिक्सल आहे. तसंच या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आलं आहे. तर याची बॅटरी 3080 mAh क्षमतेची आहे.

रेडमी Y1 प्रमाणेच रेडमी Y1 लाइटमध्ये फीचर्स असणार आहेत. मात्र, यामध्ये स्नॅपड्रॅगन 435 प्रोसेसर, 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल मेमरी असणार आहे.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: xiaomi launched redmi y1 and redmi y1 lite Smartphone in India latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV