आयफोनच्या ऑर्डरवर फ्लिपकार्टने पाठवला 50 रुपयाचा कपड्याचा साबण!

मुंबईत राहणाऱ्या 26 वर्षीय तबरेज मेहबूब नागरली या सॉफ्टवेअर इंजिनियरने फ्लिपकार्टवरुन आयफोन 8 मागवला होता. पण कंपनीने त्याला चक्क 50 रुपयाचा कपड्याचा साबण पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे.

आयफोनच्या ऑर्डरवर फ्लिपकार्टने पाठवला 50 रुपयाचा कपड्याचा साबण!

 

मुंबई : फ्लिपकार्टवरुन ऑनलाईन शॉपिंग करणं एका 26 वर्षीय तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. कारण, त्या तरुणाने फ्लिपकार्टवरुन 55 हजाराच्या आयफोन-8 ची मागवला होता. पण कंपनीने त्याला चक्क 50 रुपयाचा कपड्याचा साबण पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुंबईत राहणाऱ्या 26 वर्षीय तबरेज मेहबूब नागरली या सॉफ्टवेअर इंजिनियरने फ्लिपकार्टवरुन आयफोन 8 मागवला होता. त्यासाठी त्याने कंपनीला 55 हजार रुपयांचे पेमेंटही केलं होतं. पण 22 जानेवारी रोजी त्याला डिलीवरी मिळाली, त्यावेळी बॉक्स फोडून पाहिल्यावर त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण, कंपनीने, त्याला 55 हजाराच्या आयफोनच्या बदल्यात 50 रुपयाचा कपड्याचा साबण पाठवला होता.

या प्रकारानंतर तबरेजने फ्लिपकार्टविरोधात भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी फ्लिपकार्ट विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, कंपनीने या प्रकरणी चौकशी सुरु केली असल्याची माहिती फ्लिपकार्टच्या प्रवक्त्याने पीटीआयला दिली. वास्तविक, फ्लिपकार्टवरुन मागवलेल्या वस्तूंच्या बदल्यात ग्राहकांना भलतीच वस्तू मिळण्याची ही पहिलीच घटना नाही. कंपनीवर यापूर्वीही असे अनेकवेळा आरोप झाले आहेत.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Youth orders iphone 8 worth rupees 55000 from flipkart got soap bar return
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV