'तुमच्यासाठी काय पण...'फेम संग्राम आणि खुशबू विवाहबंधनात

मराठी आणि हिंदी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी यांनी सोमवारी लगीनगाठ बांधली.

'तुमच्यासाठी काय पण...'फेम संग्राम आणि खुशबू विवाहबंधनात

मुंबई : 'तुमच्यासाठी काय पण' असं म्हणत घराघरात पोहचलेला 'देवयानी' मालिकेतील अभिनेता संग्राम साळवी बोहल्यावर चढला. मराठी आणि हिंदी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू तावडेसोबत त्याने सोमवारी लगीनगाठ बांधली. या विवाहसोहळ्याला टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती.

संग्राम आणि खुशबू यांचं लव्ह मॅरेज आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता. चंद्रशेखर गोखलेंच्या 'सांजबहर'मध्ये संग्राम आणि खुशबू एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघांचे सूत जुळले असावे.

खुलता कळी खुलेना फेम अभिज्ञा भावे, अभिनेता सुयश टिळक, विनोदी अभिनेत्री नम्रता आवटे, अमित कल्याणकर यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी लग्न आणि रिसेप्शनला उपस्थिती लावली होती. खुशबूची धाकटी बहीण तितिक्षा तावडे सध्या 'सरस्वती' मालिकेत दुहेरी भूमिकेत दिसत आहे.खुशबू तावडेचं नाव एका ब्यूटी काँटेस्टमुळे घराघरात पोहचलं. त्यानंतर 'एक मोहोर अबोल' मालिकेतून तिने टीव्हीविश्वात पाऊल ठेवलं. या मालिकेत तिने साकारलेल्या नकारात्मक व्यक्तिरेखेचं कौतुक झालं होतं.

खुशबूने धर्मकन्या, तू भेटशी नव्याने, पारिजात यासारख्या अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याशिवाय तारक मेहता का उल्टा चष्मा, प्यार की ये एक कहानी, तेर लिये, सिंहासन बत्तीसी, तेरे बिन यासारख्या हिंदी मालिकांमध्येही ती झळकली आहे.

झी युवा वाहिनीवरील 'गुलमोहर' मालिकेतील 'खांडवी वर्सेस वडापाव' या भागात संग्राम नुकताच अभिनेत्री सायली संजीवसोबत झळकला होता. 'देवयानी' मालिकेत संग्रामने साकारलेला रांगडा नायक आणि त्याचा 'तुमच्यासाठी काय पण' हा डायलॉग चांगलाच लोकप्रिय झाला होता.

टीव्ही-नाटक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Actor Sangram Salvi marries Actress Khushboo Tawde latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV