उतरन मालिकेतील 'इच्छा'ची विमानात छेडछाड

उतरन मालिकेतील 'इच्छा'ची विमानात छेडछाड

मुंबई : कलर्स टीव्हीवरील 'उतरन' या मालिकेतील इच्छाची भूमिका साकारणारी अभिनेत्री टीना दत्तासोबत छेडछाडीची घटना घडली आहे. टीनाने या छेडछेडीसंदर्भात फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. 9 डिसेंबर रोजी राजकोटला जाताना  जेट एअरवेजच्या विमानात टीनासोबत ही घटना घडली.

टीनाने फेसबुरवर लिहिलं आहे की, "जेट एअरवेजच्या विमानात सहप्रवाशाने माझ्यासोबत गैरवर्तन केलं. सहप्रवाशाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याची तक्रार मी क्रू-मेंबर्सकडे केली. परंतु स्टाफने माझी कोणतीही मदत केली नाही. कारवाई म्हणून जेट एअरवेजच्या फ्लाईट क्रूने फक्त माझी सीट बदलली."

टीना पुढे लिहिते, "सुरुवातीला विमानाच्या कॅप्टनशी मला बोलू दिलं नाही. कसंतरी कॅप्टशनची बोलणं झालं, पण त्याने सांगितलं की, संबंधित घटना आमच्या प्रोटोकॉलमध्ये येत नाही. जेट एअरवेजसाठी माझ्याकडे काही गंभीर प्रश्न आहेत. तुमच्याकडे सुरक्षेचे काही नियम आहेत का? माझ्यासोबत अतिशय चुकीची घटना घडली. सीट बदलण्याशिवाय दुसरी कोणतीही कारवाई केली नाही. मला जेट एअरवेजकडून अशी अपेक्षा नव्हती."

 
टीना दत्ताची फेसबुक पोस्ट
 

टीव्ही-नाटक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV