रोमँटिक सीनच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीच्या साडीला आग!

हे दोघे वेडिंग नाईटचं चित्रीकरण करत होते. सीनमध्ये दोघे फुलं आणि मेणबत्त्यांनी सजवलेल्या बेडवर बसले होते

By: | Last Updated: > Saturday, 4 November 2017 3:32 PM
Actress Yukti Kapoor’s saree caught fire during a romantic scene of Agnifera serial

मुंबई : ‘अॅण्ड टीव्ही’ या चॅनलवरील ‘अग्निफेरा’ या मालिकेतील मुख्य अभिनेत्री युक्ती कपूरच्या साडीला आग लागली. आग लागली त्यावेळी ती रोमँटिक सीन चित्रीत करत होती. युक्तीने परिपत्रक जारी करुन ही माहिती दिली.

या मालिकेत युक्ती रागिनी नावाची व्यक्तिरेखा साकारत असून अंकित गेरा तिचा पती अनुरागची भूमिका साकारत आहे. हे दोघे वेडिंग नाईटचं चित्रीकरण करत होते. सीनमध्ये दोघे फुलं आणि मेणबत्त्यांनी सजवलेल्या बेडवर बसले होते. याचवेळी युक्तीच्या साडीला आग लागली.

“रोमँटिक सीन माझ्यासाठी एका दु:स्वप्न ठरलं. मी अतिशय घाबरले होते. पण टीम सजग होती, त्यामुळे आम्ही या दुर्घटनेतून बचावलो,” असं युक्तीने परिपत्रकात म्हटलं आहे.

कोण आहे युक्ती?
युक्ती जयपूरची आहे. युक्तीला एअर होस्टेस बनायचं होतं, पण नशिब तिला इथे घेऊन आलं. मालिकेत बोल्ड भूमिका साकारणारी युक्ती खऱ्या आयुष्यात फारच शांत आहे. मुंबईत राहणं हेच माझ्यासाठी बोल्डनेस असल्याचं ती म्हणते. विशेष म्हणजे ऑडिशनदरम्यान मी अनेक वेळा रिजेक्ट झाले होते, पण मी ही गोष्ट सकारात्मकदृष्ट्या घेतली, असं युक्तीने एका मुलाखतीत सांगितलं.

Tv And Theatre News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Actress Yukti Kapoor’s saree caught fire during a romantic scene of Agnifera serial
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

बिग बॉस 11 : शिल्पा शिंदे-विकास गुप्ता लग्नाच्या बेडीत अडकणार?
बिग बॉस 11 : शिल्पा शिंदे-विकास गुप्ता लग्नाच्या बेडीत अडकणार?

मुंबई : बिग बॉसचा अकरावा सीझन सध्या अतिशय चर्चेत आहे. कधी बंदगी आणि

सितारा देवी यांना गुगलचा डूडलद्वारे सलाम!
सितारा देवी यांना गुगलचा डूडलद्वारे सलाम!

मुंबई: कथ्थकच्या सच्च्या उपासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, प्रसिद्ध

हसणं थांबणार, 'चला हवा येऊ द्या' निरोप घेणार!
हसणं थांबणार, 'चला हवा येऊ द्या' निरोप घेणार!

मुंबई : ‘कसं काय मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे,’ निलेश साबळेचा हा

नावासारखाच सरळमार्गी विनोदवीर: शरद तळवलकर!
नावासारखाच सरळमार्गी विनोदवीर: शरद तळवलकर!

मुंबई: कॉमेडीच्या नावे ओढून ताणून पांचट विनोद करुन, कृत्रिम हास्य

वसगडेकरांचा 'तुझ्यात जीव रंगला'ला नेमका विरोध का?
वसगडेकरांचा 'तुझ्यात जीव रंगला'ला नेमका विरोध का?

कोल्हापूर: ‘तुझ्यात जीव रंगला’ या झी मराठीवरील प्रसिद्ध

अक्षयकुमारच्या 'बजाओ' कमेंटवर पत्नी ट्विंकल खन्ना म्हणते...
अक्षयकुमारच्या 'बजाओ' कमेंटवर पत्नी ट्विंकल खन्ना म्हणते...

मुंबई : कॉमेडियन मल्लिका दुआ आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्यात सुरु

'तुझ्यात जीव रंगला'चं शूटिंग थांबवा, गावकऱ्यांची मागणी
'तुझ्यात जीव रंगला'चं शूटिंग थांबवा, गावकऱ्यांची मागणी

कोल्हापूर : प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ‘झी मराठी’वरील

मोदींची मिमिक्री महागात, कॉमेडियन श्याम रंगीला एलिमिनेट
मोदींची मिमिक्री महागात, कॉमेडियन श्याम रंगीला एलिमिनेट

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी

अक्षय, तुझ्या मुलीला कोणी 'ती' कमेंट केली तर? : मल्लिका
अक्षय, तुझ्या मुलीला कोणी 'ती' कमेंट केली तर? : मल्लिका

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारने ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर

सब टीव्हीचे संस्थापक गौतम अधिकारी यांचं निधन
सब टीव्हीचे संस्थापक गौतम अधिकारी यांचं निधन

मुंबई: टीव्ही क्षेत्रातील दिग्गज नाव आणि ‘अधिकारी ब्रदर्स’चे श्री