KBC 9 मध्ये 1 कोटी जिंकणारी पहिली महिला!

1 कोटी रुपये जिंकल्यानंतर अनामिका म्हणाली की, 'मोठी रक्कम जिंकता यावी यासाठीच मी या शोमध्ये सहभागी झाली होती. पण मी विचार नव्हता केला की, मी कोट्यधीश होईल.'

By: | Last Updated: > Wednesday, 4 October 2017 5:44 PM
anamika won 1 crore in KBC 9 latest update

मुंबई : ‘कोन बनेगा करोडपती’च्या 9 व्या मोसमात झारखंडची अनामिका मजुमदार हिनं नवा इतिहास रचला आहे. या मोसमातील ती पहिली करोडपती महिला ठरली आहे. तिने 15 प्रश्नांची अचूक उत्तरं देत ही किमया साधली. पण तिला सोळाव्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. त्यामुळे तिला 7 कोटी जिंकता आले नाही.

 

झारखंडच्या जमशेदपूरमध्ये राहणारी अनामिका ही ‘फेथ इन इंडिया’ नावाची एनजीओ चालवते.

 

1 कोटी रुपये जिंकल्यानंतर अनामिका म्हणाली की, ‘मोठी रक्कम जिंकता यावी यासाठीच मी या शोमध्ये सहभागी झाली होती. पण मी विचार नव्हता केला की, मी कोट्यधीश होईल.’

 

अनामिकानं पुढील 15 प्रश्नांची अचूक उत्तर देऊन तब्बल 1 कोटी रुपये जिंकले.

 

1. 2017 मधील कोणता सिनेमा आहे की ज्यामध्ये आयुष्मान खुरानानं काम केलं होतं

बरेली की बर्फी

 

2. यापैकी कोणत्या सणावेळी विवाहित बंगाली महिला या ‘सिंदूर खेला’ खेळतात

दुर्गा पूजा

 

3. पद्मश्री पुरस्कार विजेते तरला दलाल आणि संजीव कपूर हे कोणत्या क्षेत्रातील आहे.

पाक कला

 

4. संर्पगंधा आणि अश्वगंधा हे कशाचे प्रकार आहेत

झाडाचे

 

kbc 1

 
5. अस्थायी आवास, कॅम्प या शब्दाचा हिंदी अर्थ काय आहे?

डेरा

 

6. हा आवाज कुणाचा आहे? – या वेळी एका अभिनेत्रीचा आवाज ऐकवण्यात आला होता.

विद्या बालन

 

7. कोणत्या राजकारणी आणि नागरिक अधिकारी कार्यकर्तेला ‘आर्यन लेडी’ नावानं ओळखलं जातं.

इरोम शर्मिला

 

8. कोणता पक्षी सर्वात उंच उडतो आणि जो आपल्या एकाच पार्टनरसोबत आयुष्य घालवतो?

सारस क्रेन

 

9. जर निर्मला सीतारमन भारतच्या दुसऱ्या संरक्षणमंत्री आहेत तर पहिल्या संरक्षणमंत्री कोण होत्या?

इंदिरा गांधी

 

10. 2017 साली टाटा सन्सच्या चेअरमनपदी कोण विराजमान झालं?

एन. चंद्रशेखरन

 

11. ‘कर के दिखला दे गोल’ हे प्रमोशनल गाणं कोणत्या स्पर्धेसाठी आहे?

फिफा अंडर 17 वर्ल्ड कप

 

12. महाभारतात सांगितल्याप्रमाणे, यापैकी कोणी दोन वेगवेगळ्या स्वरुपात दोन आईंच्या उदरातून जन्म घेतला?

जरासंध

 

13. जवाहरलाल नेहरुंच्या मंत्रिमंडळातील कोणत्या सदस्यानं त्यागपत्र देऊन 1951 साली नव्या पक्षाची स्थापना केली होती?

श्यामा प्रसाद मुखर्जी

 

14. मित्रभेद, मित्रलाभ, काकोलुकीयम्, लब्धप्रणाश और अपरीक्षित-कारकम् हे कोणत्या ग्रंथातील विभिन्न अध्यायाचे भाग आहेत?

पंचतन्त्र

 

15. यापैकी कोणत्या चित्रकाराकडे भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीच्या चित्रणाचं काम सोपवण्यात आलं होतं?

नंदलाल बोस

 

 

Tv And Theatre News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:anamika won 1 crore in KBC 9 latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017

1. राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तीव्र, धुळ्यात अर्धनग्न

बिग बॉस 11मधील 'या' स्पर्धकांचं मानधन किती?
बिग बॉस 11मधील 'या' स्पर्धकांचं मानधन किती?

मुंबई : रियालिटी शो ‘बिग बॉस’च्या 11व्या मोसमात हिना खान, हितेन,

अभिनेता राम कपूर विरोधात फसवणुकीचा गुन्हा
अभिनेता राम कपूर विरोधात फसवणुकीचा गुन्हा

मुंबई : ‘बडे अच्छे लगते है’ फेम अभिनेता राम कपूर विरोधात मुंबईतील

श्वेता तिवारीचा दुसरा संसारही मोडण्याच्या मार्गावर?
श्वेता तिवारीचा दुसरा संसारही मोडण्याच्या मार्गावर?

मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या शोसाठी चर्चेत असते.

अनुपम खेर एफटीआयआयचे नवे अध्यक्ष
अनुपम खेर एफटीआयआयचे नवे अध्यक्ष

नवी दिल्ली : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची

... म्हणून केबीसीच्या सेटवर अमिताभ बच्चन भावुक झाले!
... म्हणून केबीसीच्या सेटवर अमिताभ बच्चन भावुक झाले!

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ शो सुरु

बिग बॉसच्या घरात हायवोल्टेज ड्रामा, झुबेरची सलमानविरोधात तक्रार
बिग बॉसच्या घरात हायवोल्टेज ड्रामा, झुबेरची सलमानविरोधात तक्रार

मुंबई : ‘बिग बॉस सीझन 11’ च्या पहिल्या आठवड्यात घराबाहेर पडलेला

INT मध्ये किर्ती कॉलेजची 'ईव्हॉल्यूशन ए क्वेश्चनमार्क' एकांकिका अव्वल
INT मध्ये किर्ती कॉलेजची 'ईव्हॉल्यूशन ए क्वेश्चनमार्क' एकांकिका...

मुंबई : यंदाच्या आयएनटी एकांकिका स्पर्धेवर दादरच्या कीर्ती

‘मल्लिका ए गझल’ बेगम अख्तर यांना गुगलचा डूडलद्वारे सलाम
‘मल्लिका ए गझल’ बेगम अख्तर यांना गुगलचा डूडलद्वारे सलाम

मुंबई: ‘मल्लिका ए गझल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेगम अख्तर यांना

रिंकू राजगुरु सध्या काय करते?
रिंकू राजगुरु सध्या काय करते?

अकलूज (सोलापूर) : ‘एबीपी माझा’च्या ‘रंग माझा वेगळा’ ह्या