अर्शी खान 'बिग बॉस'मधून मिळालेले पैसे अनाथ मुलांसाठी खर्च करणार

अर्शी खान मागील तीन वर्षांपासून आपला वाढदिवस गरीब, अनाथ मुलांसोबत साजरा करत आहे.

अर्शी खान 'बिग बॉस'मधून मिळालेले पैसे अनाथ मुलांसाठी खर्च करणार

मुंबई : कलर्स टीव्हीवरील सर्वात चर्चित आणि वादग्रस्ट रिअॅलिटी शो बिग बॉस सीझन 11 च्या शनिवारच्या एपिसोडमधून अर्शी खान घरातून बेघर झाली. अर्शी या शोची विजेती बनली नसली तरी तिला यासाठी चांगली आणि मोठी रक्कम मिळाली आहे.

पण अर्शी खान हा पैसा स्वत:वर नाहीतर अनाथ मुलांच्या शिक्षणावर खर्च करणार आहे. अर्शी खान अनेक वेळा घरात भांडणं करताना दिसली. पण एवढं करुन मिळालेली रक्कम ती सामाजिक कार्यासाठी खर्च करणार आहे. बिग बॉस सीझन 11 मध्ये अर्शी खान टॉप 10 मध्ये पोहोचली होती.

अर्शी खान मागील तीन वर्षांपासून आपला वाढदिवस गरीब, अनाथ मुलांसोबत साजरा करत आहे. याशिवाय मुलांसाठी सुरु असलेल्या शिक्षण आणि इतर कार्यक्रमांमध्ये ती सहभागी होते. अर्शीचा एक व्हिडीओ सध्या शेअर होत असून त्यात ती अनाथ मुलांना जेवण आणि मिठाई वाटताना दिसत आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर अर्शी खान मुलांसाठी एक सपोर्ट ग्रुपही बनवणार आहे. हा ग्रुप या मुलांना सुट्टीत प्रशिक्षण देईल, ज्यामुळे त्यांना भविष्यात नोकरी मिळेल आणि त्यांचं आयुष्य सुखकर होईल, असं अर्शी खानच्या मॅनेजरने सांगितलं.

टीव्ही-नाटक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV