हसणं थांबणार, 'चला हवा येऊ द्या' निरोप घेणार!

या शोच्या माध्यमातून मराठी चित्रपटांना, मालिकांना तसंच कलाकारांना प्रमोशनसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं होतं.

By: | Last Updated: > Tuesday, 7 November 2017 2:55 PM
Chala Hava Yevu Dya to go off air soon

मुंबई : ‘कसं काय मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे,’ निलेश साबळेचा हा प्रश्न आता प्रेक्षकांना ऐकायला मिळणार नाही. कारण सोमवार आणि मंगळवारी रात्री 9.30-10.30 दरम्यान प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ‘झी मराठी’वरील ‘चला हवा येऊ द्या’ हा शो निरोप घेण्याच्या तयारीत आहे.

‘चला हवा येऊ द्या’चा होस्ट निलेश साबळेने स्वत: याबाबत सांगितलं. आता थोडी विश्रांती घेणार आहे, असं निलेशने सोमवारच्या एपिसोडमध्ये जाहीर केलं आणि प्रेक्षकांना धक्काच बसला.

‘चला हवा येऊ द्या’मधील थुकरटवाडी, यातील श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे आणि निलेश साबळे यांनी प्रेक्षकांना प्रचंड हसवलं. प्रेक्षकांनीही त्यांना अक्षरश: डोक्यावर घेतलं.

या शोच्या माध्यमातून मराठी चित्रपटांना, मालिकांना तसंच कलाकारांना प्रमोशनसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं होतं.

निलेशचं खुशखुशीत अँकरिंग, भाऊ आणि कुशलची हास्याची जुगलबंदी, भारत गणेशपुरेंनी साकारलेले सरपंच, पोस्टमन काकांच्या रुपात भेटलेला सागर कारंडे प्रेक्षकांना भावला. या पुरुष कलाकारांमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवणारी श्रेया बुगडे प्रेक्षकांच्या कायमच लक्षात राहिल.

‘चला हवा येऊ द्या’चं व्यासपीठ फक्त मराठीपुरतंच मर्यादित राहिलं नव्हतं. बॉलिवूड कलाकारांनाही ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर येण्याचा मोह आवरला नाही. आमीर खान, सलमान खान, शाहरुख खान, विद्या बालन, इरफान खान, श्रीदेवी, नाना पाटेकर, सोनम कपूर, जॉन अब्राहम, वरुण धवन या कलाकारांनी शोमध्ये हजेरी लावली होती.

दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’च्या जागी आता ‘सारेगमप’ हा नवीन शो सुरु होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

‘माझा कट्टा’वर ‘चला हवा येऊ द्या’ची टीम

Tv And Theatre News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Chala Hava Yevu Dya to go off air soon
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

बिग बॉस 11 : शिल्पा शिंदे-विकास गुप्ता लग्नाच्या बेडीत अडकणार?
बिग बॉस 11 : शिल्पा शिंदे-विकास गुप्ता लग्नाच्या बेडीत अडकणार?

मुंबई : बिग बॉसचा अकरावा सीझन सध्या अतिशय चर्चेत आहे. कधी बंदगी आणि

सितारा देवी यांना गुगलचा डूडलद्वारे सलाम!
सितारा देवी यांना गुगलचा डूडलद्वारे सलाम!

मुंबई: कथ्थकच्या सच्च्या उपासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, प्रसिद्ध

रोमँटिक सीनच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीच्या साडीला आग!
रोमँटिक सीनच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीच्या साडीला आग!

मुंबई : ‘अॅण्ड टीव्ही’ या चॅनलवरील ‘अग्निफेरा’ या मालिकेतील

नावासारखाच सरळमार्गी विनोदवीर: शरद तळवलकर!
नावासारखाच सरळमार्गी विनोदवीर: शरद तळवलकर!

मुंबई: कॉमेडीच्या नावे ओढून ताणून पांचट विनोद करुन, कृत्रिम हास्य

वसगडेकरांचा 'तुझ्यात जीव रंगला'ला नेमका विरोध का?
वसगडेकरांचा 'तुझ्यात जीव रंगला'ला नेमका विरोध का?

कोल्हापूर: ‘तुझ्यात जीव रंगला’ या झी मराठीवरील प्रसिद्ध

अक्षयकुमारच्या 'बजाओ' कमेंटवर पत्नी ट्विंकल खन्ना म्हणते...
अक्षयकुमारच्या 'बजाओ' कमेंटवर पत्नी ट्विंकल खन्ना म्हणते...

मुंबई : कॉमेडियन मल्लिका दुआ आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्यात सुरु

'तुझ्यात जीव रंगला'चं शूटिंग थांबवा, गावकऱ्यांची मागणी
'तुझ्यात जीव रंगला'चं शूटिंग थांबवा, गावकऱ्यांची मागणी

कोल्हापूर : प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ‘झी मराठी’वरील

मोदींची मिमिक्री महागात, कॉमेडियन श्याम रंगीला एलिमिनेट
मोदींची मिमिक्री महागात, कॉमेडियन श्याम रंगीला एलिमिनेट

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी

अक्षय, तुझ्या मुलीला कोणी 'ती' कमेंट केली तर? : मल्लिका
अक्षय, तुझ्या मुलीला कोणी 'ती' कमेंट केली तर? : मल्लिका

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारने ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर

सब टीव्हीचे संस्थापक गौतम अधिकारी यांचं निधन
सब टीव्हीचे संस्थापक गौतम अधिकारी यांचं निधन

मुंबई: टीव्ही क्षेत्रातील दिग्गज नाव आणि ‘अधिकारी ब्रदर्स’चे श्री