अक्षय, तुझ्या मुलीला कोणी 'ती' कमेंट केली तर? : मल्लिका

'अक्षय कुमारच्या मुलीला कोणी मजेत म्हटलं, नितारा जी, आप बेल बजाईये, मै आपकी बजाता हू' तर त्याच्या पचनी पडेल का?' असं मल्लिकाने ठामपणे विचारलं आहे.

By: | Last Updated: > Friday, 27 October 2017 1:11 PM
Comedian Mallika Dua On Akshay Kumar’s Sexist Comment latest update

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारने ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या मंचावर केलेली कमेंट सहपरीक्षक मल्लिका दुआला रुचलेली नाही. अक्षयच्या मुलीला कोणी ‘तशा’ प्रकारे कमेंट केली तर त्याला रुचेल का? असा सवाल तिने केला.

मोठ्या सेलिब्रेटींना ‘चार्म’ आणि ‘हार्म’ मधला फरक कळत नाही, असं म्हणत मल्लिकाने संताप व्यक्त केला आहे. अक्षय हे फक्त उदाहरण आहे, पण इतर अनेक सेलिब्रेटींना याचं भान नसल्याचं मल्लिका म्हणाली. जे-जे सेलिब्रेटींना आपल्या महिला सहकाऱ्याला तिच्या संमतीविना कवटाळतात, त्यांना हा सवाल असल्याचं ती म्हणाली.

मल्लिकाने एक खुलं पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘अक्षय कुमारच्या मुलीला कोणी मजेत म्हटलं, नितारा जी, आप बेल बजाईये, मै आपकी बजाता हू’ तर त्याच्या पचनी पडेल का?’ असं मल्लिकाने ठामपणे विचारलं आहे.

 

‘महिला असो वा पुरुष. हेतूपुरस्पर किंवा चुकून. कामाच्या ठिकाणी एटिकेट्स न पाळणाऱ्या सर्वांसाठी हे आहे. तुमच्यामुळे एखाद्याला कामाच्या ठिकाणी अवघडल्यासारखं होता कामा नये. प्रोफेशनल कम्युनिकेशनचं भान प्रत्येकानं बाळगावं’ असं मल्लिका दुआ म्हणते.

‘मल्लिकाजी आप बेल बजाईये, मै आपकी बजाता हू’ असं अक्षय कॉमेडी शोच्या सेटवर म्हणाला होता. हा भाग चॅनेलने प्रक्षेपित केला नाही, मात्र अक्षयच्या टिपणीचं वृत्त सोशल मीडियवर पसरलं आणि मल्लिका दुआसह तिचे चाहतेही नाराज झाले.

 


‘बेल वाजवणं’ हा ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ मध्ये स्पर्धकाचं कौतुक करण्याचा प्रकार आहे. सुपरजज अक्षयने जज मल्लिकाला स्पर्धकाचं कौतुक करण्यास सांगताना ही कमेंट केली.

 

मल्लिका प्रमाणेच तिचे वडील, ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआही संतापले आहेत. त्यांनी फेसबुकवर आपला राग व्यक्त केला आहे.

Tv And Theatre News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Comedian Mallika Dua On Akshay Kumar’s Sexist Comment latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

बिग बॉस 11 : शिल्पा शिंदे-विकास गुप्ता लग्नाच्या बेडीत अडकणार?
बिग बॉस 11 : शिल्पा शिंदे-विकास गुप्ता लग्नाच्या बेडीत अडकणार?

मुंबई : बिग बॉसचा अकरावा सीझन सध्या अतिशय चर्चेत आहे. कधी बंदगी आणि

सितारा देवी यांना गुगलचा डूडलद्वारे सलाम!
सितारा देवी यांना गुगलचा डूडलद्वारे सलाम!

मुंबई: कथ्थकच्या सच्च्या उपासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, प्रसिद्ध

हसणं थांबणार, 'चला हवा येऊ द्या' निरोप घेणार!
हसणं थांबणार, 'चला हवा येऊ द्या' निरोप घेणार!

मुंबई : ‘कसं काय मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे,’ निलेश साबळेचा हा

रोमँटिक सीनच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीच्या साडीला आग!
रोमँटिक सीनच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीच्या साडीला आग!

मुंबई : ‘अॅण्ड टीव्ही’ या चॅनलवरील ‘अग्निफेरा’ या मालिकेतील

नावासारखाच सरळमार्गी विनोदवीर: शरद तळवलकर!
नावासारखाच सरळमार्गी विनोदवीर: शरद तळवलकर!

मुंबई: कॉमेडीच्या नावे ओढून ताणून पांचट विनोद करुन, कृत्रिम हास्य

वसगडेकरांचा 'तुझ्यात जीव रंगला'ला नेमका विरोध का?
वसगडेकरांचा 'तुझ्यात जीव रंगला'ला नेमका विरोध का?

कोल्हापूर: ‘तुझ्यात जीव रंगला’ या झी मराठीवरील प्रसिद्ध

अक्षयकुमारच्या 'बजाओ' कमेंटवर पत्नी ट्विंकल खन्ना म्हणते...
अक्षयकुमारच्या 'बजाओ' कमेंटवर पत्नी ट्विंकल खन्ना म्हणते...

मुंबई : कॉमेडियन मल्लिका दुआ आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्यात सुरु

'तुझ्यात जीव रंगला'चं शूटिंग थांबवा, गावकऱ्यांची मागणी
'तुझ्यात जीव रंगला'चं शूटिंग थांबवा, गावकऱ्यांची मागणी

कोल्हापूर : प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ‘झी मराठी’वरील

मोदींची मिमिक्री महागात, कॉमेडियन श्याम रंगीला एलिमिनेट
मोदींची मिमिक्री महागात, कॉमेडियन श्याम रंगीला एलिमिनेट

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी

सब टीव्हीचे संस्थापक गौतम अधिकारी यांचं निधन
सब टीव्हीचे संस्थापक गौतम अधिकारी यांचं निधन

मुंबई: टीव्ही क्षेत्रातील दिग्गज नाव आणि ‘अधिकारी ब्रदर्स’चे श्री