बिग बॉसच्या घरात हायवोल्टेज ड्रामा, झुबेरची सलमानविरोधात तक्रार

वीकेंड वारमध्ये सलमान खानचा दबंग अवतार पाहायला मिळाला. बिग बॉसच्या घरात शिवीगाळ करुन वातावरण बिघडवणाऱ्यांची सलमानने शाळा घेतली. पण जुबैर खानवर सलमान जास्तच नाराज होता.

बिग बॉसच्या घरात हायवोल्टेज ड्रामा, झुबेरची सलमानविरोधात तक्रार

मुंबई : 'बिग बॉस सीझन 11' च्या पहिल्या आठवड्यात घराबाहेर पडलेला स्पर्धक झुबेर खानने सलमान खानविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. होस्ट सलमानने धमकी दिल्याने आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करत झुबेरने मुंबईच्या अँटॉप हिल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.

तक्रारीत काय लिहिलंय?
झुबेरने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, "सलमानने मला नॅशनल टीव्हीवर इंडस्ट्रीमध्ये काम करु देणार नाही अशी धमकी दिली. तसंच बाहेर पडल्यावर कुत्रा बनवण्याचंही म्हटलं." झुबेरने अँटॉप हिलमध्ये नोंदवलेली लेखी तक्रार लोणावळा पोलिसांनाही पाठवली आहे.

झुबेरच्या तक्रारीची कॉपी

Jubair_Complain

सलमान आणि कलर्सवर गंभीर आरोप
झुबेरने सलमान खान आणि कलर्स चॅनलवर आरोप करताना म्हटलं आहे की, "मी कधीही स्वत:ला दाऊदची बहिण हसीना पारकरचा जावई समजलं नाही. कलर्सच्या लोकांनी मला जी वाक्य बोलायला सांगितली ती मी माझ्या व्हिडीओत बोललो. सलमानने मला सगळ्यासमोर धमकी दिली, ज्याचं मी कायदेशीर उत्तर देणार आहे."

"सलमान खानला घाबरायला मी विवेक ओबेरॉय नाही," असंही झुबेर म्हणाला. "कलर्स चॅनलच्या लोकांनी जाणीवपूर्वक मला सरकारी रुग्णालायत दाखल न करता खासगी रुग्णालयात दाखल केलं," असा आरोपही झुबेर आणि त्याच्या वकिलांनी केला आहे.

सलमानचा दबंग अवतार
वीकेंड वारमध्ये सलमान खानचा दबंग अवतार पाहायला मिळाला. बिग बॉसच्या घरात शिवीगाळ करुन वातावरण बिघडवणाऱ्यांची सलमानने शाळा घेतली. पण झुबेर खानवर सलमान जास्तच नाराज होता.

Zuber_Salman_1

सलमानने रागाच्या भरात झुबेरला 'नल्ला डॉन' म्हटलं. सलमान एवढ्यावरच थांबला नाही, तो झुबेरला फ्रॉड म्हणाला. जेव्हा झुबेरने सलमानला 'सॉरी भाई' बोलला, तेव्हा तर तो आणखी भडकला आणि म्हणाला की, "तू मला भाई बोलायचं नाही." सलमान म्हणाला की, "नाव खराब करण्यासाठी इथे येतात, आईचं नाव धुळीला मिळवणार, मोहल्ल्याचं नाव खराब करणार आणि काय बोलणार तर मुलांसाठी आलोय."

सलमानने झापल्यानंतर झुबेर टेन्शनमध्ये आला आणि खूप गोळ्या खाल्ल्या. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

झुबेरचा नेमका वाद काय?
झुबेरचं घरातील अर्शी खानसोबत जोरदार भांडण झालं होतं. अर्शीला शिवीगाळ करत तिला अपशब्द वापरले होते. झुबेर खान स्वत:ला हसीना पारकरचा जावई आणि हसीना चित्रपटाचा निर्माता असल्याचं सांगतो. परंतु सत्य वेगळंच आहे. हसीना चित्रपटाचा सह निर्माता आणि दाऊद कुटुंबातील सदस्य समीर अंतुलेने झुबेरला फ्रॉड म्हटलं आहे. जुबैरचा आमच्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही. तो प्रसिद्धीसाठी दाऊदचं नाव वापर करत आहे.

टीव्ही-नाटक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV