'तारक मेहता...'च्या दयाबेनचा मालिकेला रामराम?

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेनची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी मालिकेला रामराम करण्याची शक्यता आहे.

'तारक मेहता...'च्या दयाबेनचा मालिकेला रामराम?

मुंबई : सब टीव्ही वाहिनीवरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेनची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी मालिकेला रामराम करण्याची शक्यता आहे. निर्मात्यांनी मात्र या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

सप्टेंबर महिन्यापासून दयाबेन 'तारक मेहता..'तून गायब आहे. तिने सहा महिन्यांची मॅटर्निटी लीव्ह घेतली होती. नोव्हेंबर महिन्यात दिशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाच्या संगोपनात व्यस्त असल्यामुळे दिशा मालिका सोडण्याची चिन्हं आहेत.

मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांनी मात्र दिशाच्या मालिका सोडण्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. 'दिशाची मुलगी लहान आहे. कुटुंबीयांना तिची गरज आहे. दिशाच्या मालिकेतील पुनरागमनाबाबत आम्ही अद्याप कोणतीही बोलणी केलेली नाही. त्यामुळे ती मालिका सोडत आहे, असं म्हणणं चुकीचं ठरेल' असं असितकुमार म्हणाले.

प्रेग्नंसीमुळे दिशाने मालिका सोडल्याचं 'स्पॉटबॉय'च्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर निर्माते नव्या चेहऱ्याच्या शोधात असल्याचं समोर आलं होतं.

दिशा वकानी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमध्ये जेठालालची पत्नी दयाबेनची भूमिका करते. बोलण्याच्या वेगळ्या लकबीमुळे तिची व्यक्तिरेखा चांगलीच गाजली. त्याशिवाय दिशाने  'जोधा-अकबर', 'देवदास', 'लव्ह स्टोरी 2050' आणि 'मंगल पांडे : द रायजिंग' यासारख्या सिनेमातही काम केलं आहे.

टीव्ही-नाटक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Disha Vakani aka Daya Ben to quit `Taarak Mehta Ka Ooltah Chashmah`?
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV