करीना कपूर-खान पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर झळकणार!

करीना कपूर-खान पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर झळकणार!

मुंबई : बॉलिवूडची 'बेबो' करीना कपूर-खानने आई झाल्यानंतर, पुन्हा एकदा काम सुरु केलं आहे. लवकरच ती सोनी बीबीसी अर्थच्या 'फील अलाईव्ह'चं प्रमोशन करताना दिसणार आहे.

'फील लाईव्ह'ने करीनाला आपला ब्रॅण्ड अम्बॅसिडर केलं असून, यासाठी तिनं नुकतंच एक व्हिडीओ प्रमोशनल शूट केले आहे. याच्या मेकिंगचा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. यात बेबो आपल्या नेहमीच्या अंदाजामध्ये सुंदर दिसत आहे. याचा व्हिडिओ क्रोमावर शूट करण्यात आला आहे.

दरम्यान, करीना मोठ्या पडद्यावर लवकरच दिसणार आहे. 'वीरे दी वेडिंग'मध्ये ती सोनम कपूरसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

व्हिडीओ पाहा

टीव्ही-नाटक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV