'बेहद' मालिकेच्या सेटवर आग, कुशल टंडनने जेनिफर विंगेटचे प्राण वाचवले

By: नेहा सावंत, एबीपी माझा, मुंबई | Last Updated: Wednesday, 8 February 2017 2:42 PM
'बेहद' मालिकेच्या सेटवर आग, कुशल टंडनने जेनिफर विंगेटचे प्राण वाचवले

मुबंई : सोनी टीव्हीवरील ‘बेहद’ मालिकेच्या सेटला शूटिंगदरम्यान मोठी आग लागली. मुख्य भूमिका साकारणारा कुशल टंडन जखमी झाला आहे. पण त्याने एखाद्या हिरोप्रमाणेच अभिनेत्री जेनिफर विंगेटला आगीतून वाचवलं.

कशी लागली आग?

मालिकेत लग्नाचा सीक्वेन्सचं शूटिंग सुरु होता. कथेनुसार लग्नाच्या या सीनमध्ये आग लागणार होती. त्याप्रमाणे आग लागली. पण अचानकच आग पसरत गेली आणि तिथे एकच गोंधळ उडाला.

आग पसरल्याचं लक्षात येताच पहिल्यांदा कुशल टंडन पळून गेला. पण जेनिफर विंगेट तिथेच असल्याचं दिसल्यावर तो पुन्हा तिथे गेला आणि जेनिफरला वाचवलं.

कुशलने ट्वीट करुन शुभचिंतक आणि चाहत्यांचे प्रार्थनांसाठी आभार मानले. मात्र मान आणि पायाला दुखापत झाल्याचंही त्याने सांगितलं.

Bayhadh_Set_Fire

अॅक्शन डायरेक्टरविरोधात कुशलची नाराजी

कुशल टंडनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन मालिकेच्या अॅक्शन डायरेक्टरांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कुशलने लिहिलं आहे की, “जे झालं ते एखाद्या सीनसारखं असल्याचं मला वाटत होतं, पण ते प्रत्यक्षात घडलं. ज्याप्रकारे मी दुसऱ्यांदा आगीच्या ठिकाणी गेलो…घरी जाताना हा व्हिडीओ पाहून मला हसू येत होतं. पण ते अतिशय भीतीदायक होतं. मला कळलंच नाही, त्यावेळी माझ्या डोक्यात काय सुरु होतं. असे सीन चित्रित करताना सुरक्षेची काळजी घेणं हे अॅक्शन दिग्दर्शकाचं काम होतं. त्या मुलीला वाचवण्यासाठी तिथे एकही अॅक्शन डायरेक्टर आला नाही. मी देवाचे आभार मानतो, त्यावेळी तिला वाचवण्याचं बळ मला दिलं.”

पाहा व्हिडीओ

First Published: Wednesday, 8 February 2017 2:34 PM

Related Stories

अजान वाद: अदनान सामी सोनू निगमच्या पाठिशी!
अजान वाद: अदनान सामी सोनू निगमच्या पाठिशी!

मुंबई: गायक सोनू निगमने मशिदीवरील लाऊडस्पीकरला विरोध केल्याने

सोनू निगमच्या समर्थनार्थ बाबू भाई मैदानात!
सोनू निगमच्या समर्थनार्थ बाबू भाई मैदानात!

मुंबई: मशिदीवरील स्पीकरमुळे होणाऱ्या त्रासाबाबत गायक सोनू निगमने

'क्योंकि सास भी...'च्या शीर्षक गीतावर भांगडा, स्मृती इराणी म्हणतात...
'क्योंकि सास भी...'च्या शीर्षक गीतावर भांगडा, स्मृती इराणी म्हणतात...

नवी दिल्ली : गेल्या दशकाच्या सुरुवातीला टेलिव्हिजन जगतात स्टार

अभिनेता सिद्धार्थ जाधव-तृप्ती 'नच बलिए'तून बाद
अभिनेता सिद्धार्थ जाधव-तृप्ती 'नच बलिए'तून बाद

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि त्याची ‘बलिए’ तृप्ती जाधव

'पिंगा'वर सिद्धार्थने साडी नेसून हृतिकला नाचवलं!
'पिंगा'वर सिद्धार्थने साडी नेसून हृतिकला नाचवलं!

मुंबई:  मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने बॉलिवूड अभिनेता हृतिक

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील कलाकाराला मॉलमध्ये बेदम मारहाण
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील कलाकाराला मॉलमध्ये बेदम मारहाण

मुंबई: मुलुंडच्या आर मॉलमध्ये एका टीव्ही कलाकाराला बेदम मारहाण

सिद्धूचा अश्लिल विनोद, वकिलाची मुख्य सचिवांकडे तक्रार
सिद्धूचा अश्लिल विनोद, वकिलाची मुख्य सचिवांकडे तक्रार

मुंबई: कॉमेडी किंग कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’च्या मागे

सुनील ग्रोव्हर आणि सनी लिओनी एकत्र झळकणार
सुनील ग्रोव्हर आणि सनी लिओनी एकत्र झळकणार

मुंबई : सुनील ग्रोव्हरच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. कपिल

'होणार सून' फेम अभिनेता शशांक केतकरचा साखरपुडा
'होणार सून' फेम अभिनेता शशांक केतकरचा साखरपुडा

मुंबई : ‘होणार सून मी ह्या घरची’ फेम टीव्ही अभिनेता शशांक केतकर

औरंगाबादच्या गोळेगावातही 'तुफान आलंया', वॉटर कपसाठी श्रमदान सुरु
औरंगाबादच्या गोळेगावातही 'तुफान आलंया', वॉटर कपसाठी श्रमदान सुरु

औरंगाबाद : औरंगाबादमधील खुलताबाद तालुक्यातल्या गोळेगावात पाणी