‘हम पाँच’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

‘हम पाँच’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: एकेकाळी ज्या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. ती ‘हम पाँच’ मालिका पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहे. झी टीव्हीवर प्रदर्शित होणारी ही मालिका प्रचंड गाजलेली आणि मालिकेतल्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांचं प्रेम होतं.

आता त्याच मालिकेतील भूमिकांसाठी ऑडिशन घेऊन ही मालिका 'हम पाँच फिर से' नावाने प्रदर्शित होणार आहे. या मालिकेची निर्मिती एस्सेल व्हिजन प्रोडक्शन्स करणार असून मालिकेला एक मॉडर्न टच देण्याचा निर्मात्यांचा विचार आहे.

या मालिकेत अशोक सराफ यांची भूमिका फारच गाजली होती. याच मालिकेतून अभिनेत्री विद्या बालननंही पदार्पण केलं होतं. या मालिकेतील प्रत्येक कलाकार आजही प्रेक्षकांच्या तितकाच लक्षात आहे.

१९९५ आणि २००५ मध्ये प्रचंड गाजलेल्या या मालिकेचं नवीन रूप आता प्रेक्षकांना किती आवडेल हे पाहणंही औत्सुक्याचे ठरणार आहे.

टीव्ही-नाटक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV