बानू आणि शिवचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

ऋषीने महिन्याभरापूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोला 'इट्स बीन अ व्हाईल नाऊ' म्हणजेच 'या गोष्टीला बराच काळ झाला' अशी कॅप्शन दिली होती

बानू आणि शिवचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : झी मराठी वर गाजलेल्या दोन मालिकांमधील आघाडीचे चेहरे एकत्र पाहायला मिळत आहेत. जय मल्हार मालिकेत बानूची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री इशा केसकर आणि काहे दिया परदेस मधला शिव अर्थात ऋषी सक्सेना यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इशा आणि ऋषी यांच्यामध्ये 'काही' सुरु आहे का, अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. मात्र दोघांपैकी कोणीही याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

ऋषीने महिन्याभरापूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोला 'इट्स बीन अ व्हाईल नाऊ' म्हणजेच 'या गोष्टीला बराच काळ झाला' अशी कॅप्शन दिली होती. त्यामुळे या फोटोवर अनेकांनी तुम्ही 'डेट करत आहात का?' अशा प्रश्नांपासून 'नाईस जोडी' अशा कमेंट्सही केल्या आहेत.It’s been a while ! 😊😊


A post shared by Rishi Saxena (@rishi_saxena_official) on


इशाने जय मल्हार या मालिकेत साकारलेली बानूची व्यक्तिरेखा वाहवा मिळवून गेली होती. तर दुसरीकडे, काहे दिया परदेस या मराठी मालिकेत शिव ही अमराठी व्यक्तिरेखा साकारणाऱ्या ऋषी सक्सेनाला खूप मोठा फॅन फॉलोईंग मिळाला होता.

टीव्ही-नाटक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Isha Keskar and Rishi Saxena’s instagram post latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV