'जय मल्हार' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला...

By: | Last Updated: > Thursday, 8 June 2017 11:02 AM
'जय मल्हार' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला...

मुंबई : लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेली ‘झी मराठी’वरील ‘जय मल्हार’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र ही मालिका आता हिंदी भाषेत पाहायला मिळणार आहे. ‘झी’च्या हिंदी वाहिनीवर खंडेराया-म्हाळसा आणि बानूचं दर्शन घडणार आहे.

मूळ मराठी मालिकेचं हिंदीत डबिंग केलं जाणार आहे. अमराठी प्रेक्षकांपर्यंत खंडेरायांची महती पोहचवण्यासाठी हा प्रयत्न केला जाणार आहे. हिंदीत डब होणारी जय मल्हार ही पहिलीच मराठी पौराणिक मालिका असेल. मराठीतील भव्यता आता देशभरातील प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

खंडेराय, म्हाळसा, बानू यांच्या व्यक्तिरेखांना हिंदीत आवाज देण्यासाठी व्हॉइस आर्टिस्ट्स निवडण्यात आले आहेत. दिग्दर्शक-निर्माते महेश कोठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली होती. देवदत्त नागे, सुरभी हांडे आणि इशा केसकर यांच्या मालिकेत मुख्य भूमिका होत्या.

मे 2014 मध्ये सुरु झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. जवळपास तीन वर्षी टीआरपीमध्ये अव्वल राहिलेल्या या मालिकेने एप्रिल 2017 मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला.

व्हीएफएक्स पद्धतीने खंडेरायाच्या कथेला नवा साज आणि भव्यता देण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर झालेली ही मराठीतील पहिलीच मालिका ठरली होती.

First Published:

Related Stories

‘हम पाँच’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
‘हम पाँच’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: एकेकाळी ज्या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं

...म्हणून सुनील ग्रोव्हर छोट्या पडद्यावर पुन्हा परतणार!
...म्हणून सुनील ग्रोव्हर छोट्या पडद्यावर पुन्हा परतणार!

नवी दिल्ली : विनोदवीर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील

श्वेता तिवारीच्या मृत्यूची बातमी व्हायरल, अफवेवर पतीचं स्पष्टीकरण
श्वेता तिवारीच्या मृत्यूची बातमी व्हायरल, अफवेवर पतीचं स्पष्टीकरण

मुंबई: सोशल मीडियावर अनेकदा अफवाचं पीक पाहायला मिळतं. अगदी 10वी किंवा

व्हिडिओ : प्री वेडिंग शूटसाठी 'तुझ्यात जीव रंगला'च्या गाण्याची क्रेझ
व्हिडिओ : प्री वेडिंग शूटसाठी 'तुझ्यात जीव रंगला'च्या गाण्याची क्रेझ

मुंबई : प्री वेडिंग शूटसाठी लोकं आजकाल काय करतील याचा नेम नाही.

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/05/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/05/2017

1. कुलभूषण जाधव प्रकरणाचा निकाल गुरुवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयात

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर सचिनची फटकेबाजी
'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर सचिनची फटकेबाजी

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चला ‘हवा येऊ द्या’च्या

माझ्या टीव्ही मालिकाही इतर टीव्ही मालिकांसारख्या 'स्टुपिड': एकता कपूर
माझ्या टीव्ही मालिकाही इतर टीव्ही मालिकांसारख्या 'स्टुपिड': एकता...

मुंबई: निर्माती-दिग्दर्शिका एकता कपूरनं आपल्या टीव्ही मालिकेबद्दल

मायकल जॅक्सन ते जस्टिन बिबर, वादांची मालिका
मायकल जॅक्सन ते जस्टिन बिबर, वादांची मालिका

मुंबई: जगप्रसिद्ध पॉपसिंगर जस्टिन बिबरचा आज नवी मुंबईतल्या डी.

तोंडाने वाद्यांचे आवाज, 'एकला चलो रे'तून टागोरांना आदरांजली
तोंडाने वाद्यांचे आवाज, 'एकला चलो रे'तून टागोरांना आदरांजली

मुंबई : रविंद्रनाथ टागोर… भारताचे पहिले नोबेल विजेते. रवींद्रनाथ

2 फाईव्ह स्टार हॉटेल, 1 हेलिकॉप्टर, जस्टिन बिबरच्या मागण्यांची यादी
2 फाईव्ह स्टार हॉटेल, 1 हेलिकॉप्टर, जस्टिन बिबरच्या मागण्यांची यादी

मुंबई: इंटरनॅशनल पॉप सिंगर जस्टिन बिबर एका भव्य म्युझिक