'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला

शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी राजे यांच्या जीवनावर आणि त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी 'संभाजी' ही नवी मालिका 24 सप्टेंबरपासून झी मराठीवर रसिकांच्या भेटीला येत आहे.

Kahe Diya Pardes to go off air, Sambhaji will be on air latest update

मुंबई : गेल्या दीड वर्षापासून ‘झी मराठी’ वाहिनीवर गाजणारी शिव-गौरीची ‘काहे दिया परदेस’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. 27 सप्टेंबरपासून ‘संभाजी’ ही ऐतिहासिक मालिका ‘काहे दिया…’ ऐवजी सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता प्रक्षेपित होईल.

महाराष्ट्राची लेक गौरी आणि वाराणसीचा छोरा शिव यांची प्रेमकथा असलेल्या ‘काहे दिया परदेस’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतली होती. सायली संजीवने यात गौरीची, तर रिषी सक्सेनाने यामध्ये शिव ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांच्याशिवाय दिग्गज अभिनेते मोहन जोशी, शुभांगी गोखले या मालिकेत प्रमुख भूमिकेमध्ये झळकले होते.

गेल्या वर्षी झालेल्या प्रेक्षक पसंतीच्या ‘झी मराठी पुरस्कारां’मध्ये काहे दिया परदेसने सर्वोत्कृष्ट मालिकेसह अनेक मुख्य पुरस्कार खिशात घातले होते. त्यामुळे या मालिकेचा सर्वत्र बोलबाला होता. ‘काहे दिया..’च्या अखेरच्या भागाबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे.

आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, पेशवा बाजीराव, सम्राट अशोक, झाशीची राणी लक्ष्मीबाई, टिपू सुलतान, महाराणा प्रताप यासारख्या अनेक महापुरुषांच्या गाथा हिंदी आणि मराठी भाषेत मालिका रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी राजे यांच्या जीवनावर आणि त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी ‘संभाजी’ ही नवी मालिका 24 सप्टेंबरपासून झी मराठीवर रसिकांच्या भेटीला येत आहे.

या मालिकेतून छत्रपती संभाजी राजे यांची शौर्यगाथा रसिकांना अनुभवता येणार आहे. अभिनेता अमोल कोल्हे या मालिकेत संभाजींची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी शंभूराजे नाटकात त्यांनी संभाजी राजेंची भूमिका साकारल्यामुळे या मालिकेविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे.

अभिनेता शंतनू मोघे शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असून प्रख्यात अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहे. 24 सप्टेंबर रोजी संभाजी मालिकेचा दोन तासांचा पहिला भाग प्रक्षेपित होणार आहे.

Tv And Theatre News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Kahe Diya Pardes to go off air, Sambhaji will be on air latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

इंटरनेटवरील पाठकबाईंबद्दलची ही माहिती चुकीची!
इंटरनेटवरील पाठकबाईंबद्दलची ही माहिती चुकीची!

कोल्हापूर : एखाद्या व्यक्तीला लोकप्रियता मिळाली की तिच्याबद्दल

पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!
पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!

कोल्हापूर : सच्चे चाहते आवडत्या हिरो-हिरोईनसाठी काहीही करायला तयार

फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!
फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!

कोल्हापूर : ‘अजूनही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा आहे,’ हे वाक्य आहे

'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर
'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर

मुंबई : ‘कुमकुम’ मालिकेतून घराघरात पोहचलेली टीव्ही अभिनेत्री

फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?
फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माच्या अडचणींचा सिलसिला कायम आहे. ‘द

टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार
टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार

मुंबई : क्या होगा निम्मो का, नच बलिए, लव्ह का है इंतजार यासारख्या

सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद
सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक

बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट
बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट

मुंबई : बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा

वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का
वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का

मुंबई : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ ही मालिका

पुन्हा शूटिंग रद्द, कपिल शर्माला दारुचं व्यसन?
पुन्हा शूटिंग रद्द, कपिल शर्माला दारुचं व्यसन?

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माने पुन्हा एकदा शोचं चित्रीकरण रद्द केलं