...म्हणून कपिल शर्मानं विमानातचं सुनिल ग्रोवरला धुतलं

...म्हणून कपिल शर्मानं विमानातचं सुनिल ग्रोवरला धुतलं

नवी दिल्ली : प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्मानं आपल्याच टीममधल्या सुनिल ग्रोवरला विमानात मारहाण केली आहे. ही घटना दोन दिवसापूर्वीची असून, कपिल शर्मा आपल्या टीमसोबत ऑस्ट्रेलियाहून दिल्ली वाया मुंबई प्रवास करत होता.

स्पॉटबॉय डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, कपिल शर्मा आपल्या संपूर्ण टीमसह ऑस्ट्रेलियातील सिडनी आणि मेलबर्नमध्ये शोसाठी गेला होता. हा शो संपवून हे सर्वजण ऑस्ट्रेलिया ते मुंबई असा इकॉनॉमी क्लासने प्रवास करत होते. यावेळी कपिलनं दारुच्या नशेत सुनिल ग्रोवरला मारहाण केली. या मारहाणीवेळी कपिल शर्मानं सुनिल ग्रोवरसाठी अपमानास्पद भाषेचाही वापर केल्याचं स्पॉटबॉयनं म्हणलं आहे.

या घटनेवेळी विमानातील इतर प्रवासीही घाबरले होते. त्यांनी वैमानिकाला इमर्जन्सी लॅण्डिंगचीही मागणी केली होती. मात्र यावेळी टीमच्या इतर सदस्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर कपिल शर्मा शांत झाला. याप्रकरणी सुनिल ग्रोवरनं मौन बाळगलं असून, या घटनेनंतर सुनिल ग्रोवर कपिलचा शो सोडण्याचा विचार करत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याशिवाय टीमचे इतर सदस्यही कपिलच्या वर्तणुकीवर नाराज असल्याचं वृत्त आहे. कारण कपिलला सध्या सिनेमाच्या ऑफर येऊ लागल्याने तो आपल्या टीमच्या इतर सदस्यांसोबत अपमानास्पद वर्तणुक करत असल्याचं स्पॉटबॉयनं सांगितलं आहे.

टीव्ही-नाटक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV