पुन्हा शूटिंग रद्द, कपिल शर्माला दारुचं व्यसन?

सातत्याने चित्रीकरण रद्द करुन कपिल शर्मा बॉलिवूड कलाकारांसोबतचे संबंध बिघडवत आहे.

By: | Last Updated: > Tuesday, 29 August 2017 10:51 AM
Kapil Sharma cancelling shooting because of drinking problem

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माने पुन्हा एकदा शोचं चित्रीकरण रद्द केलं आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आपल्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी पोहोचलेले बादशाहोचे कलाकार अजय देवगण, ईशा गुप्ता, इम्रान हाश्मी आणि इलियाना डिक्रूज यांना फार वेळ प्रतीक्षा करावी लागली. परंतु बराच वेळ वाट पाहूनही कपिल न आल्याने या कलाकारांना रिकाम्या हाती परतावं लागलं.

सातत्याने चित्रीकरण रद्द करुन कपिल शर्मा बॉलिवूड कलाकारांसोबतचे संबंध बिघडवत आहे. बादशाहोची टीम परतल्यानंतर सनी देओल आणि बॉबी देओल हे सोमवारी ‘पोस्टर बॉईज’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी येणार होते. परंतु कपिल शर्मा शूटिंग रद्द करेल की काय म्हणून त्यांनीच शोमध्ये न येण्याचा निर्णय घेतला.

कपिलला दारुचं व्यसन?
सूत्रांच्या माहितीनुसार, कपिल शर्माला दारुचं व्यसन लागलं आहे. तो लेट नाईट पार्टी करतो, त्यामुळे सकाळी वेळेवर उठत नाही. त्याला आरोग्याशी निगडित काही अडचणी आहेत. त्यामुळे त्याच्या अडचणी आणखीच वाढत आहेत. सुनील ग्रोव्हरसोबत विमानात झालेलं भांडणही दारुच्या नशेतच झालं होतं.

…म्हणून कपिल शर्मा मनोज वाजपेयीसमोर ढसाढसा रडला?

किती शोचं शूटिंग रद्द?
शूटिंग रद्द करण्याची सुरुवात ‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रमोशनसाठी आलेल्या शाहरुख खान आणि अनुष्का शर्मापासून झाली. त्यानंतर ‘मुबारकां’च्या प्रमोशनसाठी आलेल्या अर्जुन कपूर आणि अनिल कपूरसोबतही असंच काहीसं घडलं. ‘गेस्ट इन लंडन’चं चित्रीकरणही तब्येतीच्या कारणामुळे रद्द केलं. परंतु नंतर अर्जुन आणि अनिल कपूर यांच्यासोबत पुन्हा शूटिंग केलं. मात्र शाहरुख अनुष्कासोबतच्या एपिसोडचं शूटिंग झालं नाही. याशिवाय कपिलने आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूरला 5 तास वाट पाहायला लावलं होतं. श्रद्धाने निघून जाण्याची धमकी दिल्यानंतर तेव्हा कुठे कपिल शूटिंगसाठी आला.

‘द कपिल शर्मा शो’ बंद होण्याची चिन्हं, सुनील ग्रोव्हरचा नवा शो?

…म्हणून चॅनलने करार वाढवला!
कपिल शर्माचा शोमधील रस कमी झाला आहे, असं म्हटलं जात आहे. चॅनल त्याच्यासोबतचा करार वाढवणार नाही, असं चर्चा होती. पण कपिलची लोकप्रियता पाहता चॅनलने त्याचा करार वाढवला.

कॉमेडी स्टार कपिल शर्मा नेत्रदान करणार!

कपिलला चॅनलची नोटीस
परंतु कपिलने मागच्या चुकांमधून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. आता संकटात सापडलेल्या चॅनलकडे टेलिकास्ट करण्यासाठी कोणताही एपिसोड नाही. एका वेबसाईटनुसार, चॅनलन कपिलला नोटीसही पाठवली आहे. कपिलने त्याची वागणूक सुधारावी अन्यथा परिणाम वाईट असू शकतील, असा इशारा त्याला देण्यात आला आहे.

Tv And Theatre News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Kapil Sharma cancelling shooting because of drinking problem
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!
पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!

कोल्हापूर : सच्चे चाहते आवडत्या हिरो-हिरोईनसाठी काहीही करायला तयार

फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!
फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!

कोल्हापूर : ‘अजूनही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा आहे,’ हे वाक्य आहे

'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर
'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर

मुंबई : ‘कुमकुम’ मालिकेतून घराघरात पोहचलेली टीव्ही अभिनेत्री

फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?
फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माच्या अडचणींचा सिलसिला कायम आहे. ‘द

'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला
'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला

मुंबई : गेल्या दीड वर्षापासून ‘झी मराठी’ वाहिनीवर गाजणारी

टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार
टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार

मुंबई : क्या होगा निम्मो का, नच बलिए, लव्ह का है इंतजार यासारख्या

सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद
सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक

बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट
बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट

मुंबई : बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा

वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का
वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का

मुंबई : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ ही मालिका

जेनिफर विंगेट इंटिमेट सीन करताना दिसणार!
जेनिफर विंगेट इंटिमेट सीन करताना दिसणार!

मुंबई : छोट्या पदड्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर विंगेट लवकरच