प्रो कबड्डीची अँकर, अभिनेत्री सोनिका चौहानचा अपघाती मृत्यू

By: | Last Updated: > Saturday, 29 April 2017 7:21 PM
Kolkata-based actor Sonika Chauhan dies in car accident

कोलकाता : प्रो कबड्डीची अँकर, मॉडेल, अभिनेत्री सोनिका चौहानचा कार अपघातात मृत्यू झाला. कोलकात्यात पहाटे चारच्या सुमारास झालेल्या अपघातात सोनिकाला प्राण गमवावे लागले, तर तिच्यासोबत कारमध्ये असलेला अभिनेता विक्रम चॅटर्जी जखमी झाला आहे.

बंगाली अभिनेता विक्रमसोबत सोनिका प्रवास करत होती. त्यावेळी विक्रमचं कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. दक्षिण कोलकात्यातील रासबिहारी अव्हेन्यूमधील लेक मॉलजवळ हा अपघात घडला. नियंत्रण सुटल्याने गाडी फुटपाथवरील स्टॉल्सना धडकली.

Sonika Chouhan Vikram Chatterjee

अपघातानंतर पादचाऱ्यांनी सोनिका आणि विक्रम यांना अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढलं. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी सोनिकाला मृत घोषित केलं.

विक्रमला प्रथमोपचारांनंतर सोडून देण्यात आलं होतं, मात्र पुन्हा त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सोनिकाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

Sonika Chouhan Car

घटनास्थळावरील उपस्थितांच्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी विक्रम कार चालवत होता. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत असून वेगाच्या नियमांचं उल्लंघन झाल्याने अपघात घडला का, याचा शोध घेत आहेत.

First Published:

Related Stories

अक्कासाहेबांचं 'पुढचं पाऊल' थांबणार... कळ्ळं?
अक्कासाहेबांचं 'पुढचं पाऊल' थांबणार... कळ्ळं?

मुंबई : गेली सहा वर्ष प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणारी ‘स्टार

‘हम पाँच’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
‘हम पाँच’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: एकेकाळी ज्या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं

...म्हणून सुनील ग्रोव्हर छोट्या पडद्यावर पुन्हा परतणार!
...म्हणून सुनील ग्रोव्हर छोट्या पडद्यावर पुन्हा परतणार!

नवी दिल्ली : विनोदवीर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील

'जय मल्हार' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला...
'जय मल्हार' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला...

मुंबई : लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेली ‘झी मराठी’वरील ‘जय

श्वेता तिवारीच्या मृत्यूची बातमी व्हायरल, अफवेवर पतीचं स्पष्टीकरण
श्वेता तिवारीच्या मृत्यूची बातमी व्हायरल, अफवेवर पतीचं स्पष्टीकरण

मुंबई: सोशल मीडियावर अनेकदा अफवाचं पीक पाहायला मिळतं. अगदी 10वी किंवा

व्हिडिओ : प्री वेडिंग शूटसाठी 'तुझ्यात जीव रंगला'च्या गाण्याची क्रेझ
व्हिडिओ : प्री वेडिंग शूटसाठी 'तुझ्यात जीव रंगला'च्या गाण्याची क्रेझ

मुंबई : प्री वेडिंग शूटसाठी लोकं आजकाल काय करतील याचा नेम नाही.

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/05/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/05/2017

1. कुलभूषण जाधव प्रकरणाचा निकाल गुरुवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयात

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर सचिनची फटकेबाजी
'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर सचिनची फटकेबाजी

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चला ‘हवा येऊ द्या’च्या

माझ्या टीव्ही मालिकाही इतर टीव्ही मालिकांसारख्या 'स्टुपिड': एकता कपूर
माझ्या टीव्ही मालिकाही इतर टीव्ही मालिकांसारख्या 'स्टुपिड': एकता...

मुंबई: निर्माती-दिग्दर्शिका एकता कपूरनं आपल्या टीव्ही मालिकेबद्दल

मायकल जॅक्सन ते जस्टिन बिबर, वादांची मालिका
मायकल जॅक्सन ते जस्टिन बिबर, वादांची मालिका

मुंबई: जगप्रसिद्ध पॉपसिंगर जस्टिन बिबरचा आज नवी मुंबईतल्या डी.