महिला विश्वचषकानंतर मितालीची महिला ब्रिगेड केबीसी गाजवणार

मिताली राजच्या क्रिकेट टीममधील सहा खेळाडूंनी रिअलिटी शो 'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमाचं शूटिंग नुकतच पूर्ण झालं असून, याचं प्रक्षेपण 1 सप्टेंबर रोजी सोनी टीव्हीवरुन होणार आहे.

By: | Last Updated: > Monday, 14 August 2017 3:47 PM
mithali raj harmanpreet kaur smiriti mandhana poonam raut participate kaun banega crorepati program

फाईल फोटो

मुंबई :  आयसीसी महिला विश्वचषक-2017 च्या फायनलमध्ये मिताली राजच्या क्रिकेट संघाने दमदार कामगिरी करुन, सर्व भारतीयांची मनं जिंकली. यानंतर मितालीची महिला ब्रिगेड रिअलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी होत आहे. या कार्यक्रमाचं शूटिंग नुकतच पूर्ण झालं असून, याचं प्रक्षेपण 1 सप्टेंबर रोजी सोनी टीव्हीवरुन होणार आहे.

या कार्यक्रमात महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजसह इतर 6 खेळाडूंनी सहभाग घेतला.  एका मीडिया रिपोर्टनुसार, या कार्यक्रमात मितालीच्या टीमने एकूण 6 लाख 40 हजार रुपये जिंकले. जिंकलेली ही सर्व रक्कम सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या हैदराबादमधील ‘प्रयास’ या संस्थेला देण्यात येणार आहेत.

मिताली राज ही ‘प्रयास’ स्वयंसेवी संस्थेची ब्रॅण्ड अम्बेसेडर आहे. ही संस्था महिला अत्याचाराविरोधात काम करते. या संस्थेला आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

यात मितालीसह हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णामूर्ती, स्मृती मानधना, पूनम राऊत, झूलन गोस्वामी आणि दीप्ती शर्मा यांनी सहभाग घेतला.

Tv And Theatre News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:mithali raj harmanpreet kaur smiriti mandhana poonam raut participate kaun banega crorepati program
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!
पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!

कोल्हापूर : सच्चे चाहते आवडत्या हिरो-हिरोईनसाठी काहीही करायला तयार

फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!
फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!

कोल्हापूर : ‘अजूनही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा आहे,’ हे वाक्य आहे

'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर
'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर

मुंबई : ‘कुमकुम’ मालिकेतून घराघरात पोहचलेली टीव्ही अभिनेत्री

फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?
फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माच्या अडचणींचा सिलसिला कायम आहे. ‘द

'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला
'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला

मुंबई : गेल्या दीड वर्षापासून ‘झी मराठी’ वाहिनीवर गाजणारी

टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार
टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार

मुंबई : क्या होगा निम्मो का, नच बलिए, लव्ह का है इंतजार यासारख्या

सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद
सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक

बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट
बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट

मुंबई : बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा

वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का
वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का

मुंबई : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ ही मालिका

पुन्हा शूटिंग रद्द, कपिल शर्माला दारुचं व्यसन?
पुन्हा शूटिंग रद्द, कपिल शर्माला दारुचं व्यसन?

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माने पुन्हा एकदा शोचं चित्रीकरण रद्द केलं