माझ्या टीव्ही मालिकाही इतर टीव्ही मालिकांसारख्या 'स्टुपिड': एकता कपूर

माझ्या टीव्ही मालिकाही इतर टीव्ही मालिकांसारख्या 'स्टुपिड': एकता कपूर

मुंबई: निर्माती-दिग्दर्शिका एकता कपूरनं आपल्या टीव्ही मालिकेबद्दल अगदी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. माझ्या टीव्ही मालिका या दुसऱ्या टीव्ही मालिकेप्रमाणेच स्टुपिड असतात. असं बेधडक वक्तव्य एकतानं केलं आहे. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिनं म्हटलं की, 'माझ्या टीव्ही सीरियल या दुसऱ्या टीव्ही सीरियलसारख्या स्टुपिड आहेत.'

एकता कपूरचं म्हणणं आहे की, 'टीव्ही मालिकांबद्दल माझ्या मनात कोणतीही साशंकता नसते. माझं काम आणि वाद यांचं जुनं नातं आहे. कारण, भारतात एंटरटेनमेंटमध्ये काम करताना तुम्ही जास्त विश्वासार्ह होऊ शकत नाहीत.'

आपल्या सास-बहू मालिकेच्या माध्यमातून टीव्ही जगतात पोहचलेली एकता कपूरनं नुकतंच आपलं स्वत:चं अॅप लाँच केलं आहे. या नव्या अॅपच्या माध्यमातून ती नव्या मालिकांची वेब सीरीज सुरु करत आहे.

या मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना एकता म्हणाली की, 'टीव्ही मालिकेच्या फॉर्मेटमध्ये काम करताना माझ्या डोक्यात वेब माध्यमाचा विचार आला.'

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एकतानं 'कर ले तू भी मोहब्बत' ही वेब सीरीज तिने सुरु केली आहे. या वेब सीरीजमध्ये राम कपूर आणि साक्षी तन्वर मुख्य भूमिकेत आहेत. या वेब सीरीजला अनेकांनी पसंतीही दर्शवली आहे.

टीव्ही-नाटक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV