‘चला हवा येऊ द्या’चा नवा निवेदक प्रियदर्शन, निलेश साबळेला काही दिवस विश्रांती

‘चला हवा येऊ द्या’चा नवा निवेदक प्रियदर्शन, निलेश साबळेला काही दिवस विश्रांती

मुंबई: सोमवार आणि मंगळवारच्या रात्री आपल्याला खळखळून हसवणारे ‘चला हवा येऊ द्या’चे सूत्रधार डॉ. निलेश साबळे प्रकृती अस्वास्थ्यामुळे काहीकाळ विश्रांती घेणार आहेत. त्यामुळे यापुढे काही भागांचं निवेदन टाईमपास टू फेम प्रियदर्शन जाधव करणार आहे.

निलेश साबळे फक्त निवेदनच नाही तर लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा सर्व जबाबदाऱ्या लिलया पार पाडतो. त्यामुळे निलेशच्या अनुपस्थितीत या शोची लोकप्रियता आबाधित ठेवण्याचं आव्हान अभिनेता प्रियदर्शन जाधववर असणार आहे.

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमानं प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली. या कार्यक्रमातील कलाकारांनी नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवलं. अवघ्या महाराष्ट्राला कायम हसवत राहण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक निलेश साबळे आजवर पेलत आला आहे. हा शोची आजवर प्रचंड लोकप्रिय झाला आहे. या लोकप्रियतेची चर्चा अगदी बॉलिवूडमध्येही गेली आणि तेथील दिग्गज कलाकारांनीही या कार्यक्रमात हजेरी लावत आपल्या चित्रपटांची प्रसिद्धी केली.

पण सध्या निलेश साबेळला प्रकृती अस्वस्थ्यामुळे काही दिवस तरी त्याच्या आवडत्या शोपासून दूर राहावं लागणार आहे. त्यामुळे निलेशच्या अनुपस्थितीत प्रियदर्शन जाधवला त्याची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.

टीव्ही-नाटक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV