'बिग बॉस' विजेता प्रिन्स नरुला गळफास जाता-जाता बचावला

'बिग बॉस' विजेता प्रिन्स नरुला गळफास जाता-जाता बचावला

मुंबई : 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोच्या मागील पर्वाचा विजेता प्रिन्स नरुला हा गळफास बसता बसता थोडक्यात बचावला आहे. 'बढो बहू' या मालिकेच्या शूटिंगदरम्यान एका सीनमध्ये गळफास घेतानाचं दृष्य चित्रीत करताना हा अपघात घडला.

'अँड टीव्ही' या वाहिनीवरील 'बढो बहू' या मालिकेत प्रिन्स पैलवानाच्या भूमिकेत आहे. यामध्ये त्याचं लग्न भारदस्त नायिकेशी होणार असतं. मात्र लग्नामुळे नाखुश असलेला हा पैलवान फाशी घेणार असल्याचा सीन होता.

या सीनचं शूटिंग सुरु असताना स्टूलावर चढून प्रिन्स नरुला गळ्यात दोर लटकवून उभा होता. मात्र त्याचवेळी त्याच्या पायाखालून स्टूल सटकलं आणि तो दोराला लटकला. सेटवर हजर असलेल्या सर्वांनी त्याच्याकडे धाव घेतली. स्टूल जागेवर ठेवून त्याच्या पायांना आधार दिला आणि प्रिन्सला लगोलग खाली उतरवण्यात आलं.

प्रिन्सच्या गळ्यावर दोरखंडाचे वळही काही काळ दिसत होते. त्यामुळे चित्रीकरण थांबवण्यात आलं होतं. 'एक क्षण मीसुद्धा घाबराघुबरा झालो होतो. पण आमच्या दिग्दर्शकाने कॅमेरा सुरु ठेवल्यामुळे रिअल सीन मिळाला, हे एक बरं झालं' असं प्रिन्स म्हणतो.

टीव्ही-नाटक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV