अक्कासाहेबांचं 'पुढचं पाऊल' थांबणार... कळ्ळं?

By: | Last Updated: > Thursday, 29 June 2017 9:02 AM
Pudhacha Paool serial on Star Pravah to go off air live update

मुंबई : गेली सहा वर्ष प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणारी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘पुढचं पाऊल’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. हर्षदा खानविलकर यांनी साकारलेली ‘अक्कासाहेब सरदेशमुख’ ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा घराघरात पोहचली आहे.

सहा वर्षांहून जास्त काळ चाललेल्या या मालिकेचे दोन हजारपेक्षा जास्त एपिसोड्स झाले आहेत. मात्र शेवटचा एपिसोड कधी टेलिकास्ट होणार, याविषयी अद्याप माहिती नाही. शेवटच्या एपिसोडमध्ये काय पाहायला मिळणार, याची उत्सुकताही प्रेक्षकांमध्ये कायम आहे.

सासू-सून या टिपीकल विषयावर आधारित असूनही या मालिकेने कायमच वेगळेपण जपलं. पुरोगामी विचारांच्या कणखर अक्कासाहेबांची सून कल्याणीवर असलेली माया कौतुकाचा विषय ठरली होती. अक्कासाहेब यांचा प्रत्येक संवादाच्या अखेरीस ‘कळ्ळं’ हा शब्द प्रचंड गाजला.

हर्षदा खानविलकर यांनी अक्कासाहेब तर जुई गडकरीने कल्याणी ही भूमिका साकारली होती. काहीच महिन्यांपूर्वी कल्याणीचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. याशिवाय मृणाल चंद्रकांत, आस्ताद काळे, प्रदीप वेलणकर, शर्मिला शिंदे हे कलाकार मालिकेत झळकले होते.

Tv And Theatre News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Pudhacha Paool serial on Star Pravah to go off air live update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

'बिग बॉस 12'मध्ये सलमान खानऐवजी अक्षय कुमार?
'बिग बॉस 12'मध्ये सलमान खानऐवजी अक्षय कुमार?

मुंबई: मोस्ट अवेटेड रियालिटी शो ‘बिग बॉस’चं 11वं पर्व लवकरच सुरु

...म्हणून मी शोमधील पात्रांचा मृत्यू दाखवते : एकता कपूर
...म्हणून मी शोमधील पात्रांचा मृत्यू दाखवते : एकता कपूर

मुंबई : सिनेनिर्माती एकता कपूर आपला अपकमिंग सिनेमा ‘लिपस्टिक

नाट्यरसिकांसाठी पर्वणी, 8वं थिएटर ऑलिम्पिक भारतात
नाट्यरसिकांसाठी पर्वणी, 8वं थिएटर ऑलिम्पिक भारतात

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय स्तरावर नाटकाचा सर्वात मोठा मेळा असं

प्रसिद्ध अभिनेत्री अल्का कौशलसह आईला दोन वर्षांचा तुरुंगवास
प्रसिद्ध अभिनेत्री अल्का कौशलसह आईला दोन वर्षांचा तुरुंगवास

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही आणि सिने अभिनेत्री अल्का कौशल यांना दोन

मॉडेल सोनिका सिंहच्या मृत्यूप्रकरणी अभिनेता विक्रमला अटक
मॉडेल सोनिका सिंहच्या मृत्यूप्रकरणी अभिनेता विक्रमला अटक

कोलकाता : प्रो कबड्डीची फेम मॉडेल, अभिनेत्री सोनिका सिंह चौहानच्या

कपिलच्या शोमधून सिद्धू किती कमावतो?
कपिलच्या शोमधून सिद्धू किती कमावतो?

मुंबई: कॉमेडी किंग कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ हा टेलिव्हिजन

सगळ्यांना भरावा लागणार GST... अमेय वाघचा उखाणा
सगळ्यांना भरावा लागणार GST... अमेय वाघचा उखाणा

मुंबई : वेब सीरिज, नाटक, सिनेमा आणि मालिका अशी चौफेर मुशाफिरी करणारा

‘हम पाँच’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
‘हम पाँच’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: एकेकाळी ज्या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं

...म्हणून सुनील ग्रोव्हर छोट्या पडद्यावर पुन्हा परतणार!
...म्हणून सुनील ग्रोव्हर छोट्या पडद्यावर पुन्हा परतणार!

नवी दिल्ली : विनोदवीर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील

'जय मल्हार' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला...
'जय मल्हार' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला...

मुंबई : लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेली ‘झी मराठी’वरील ‘जय