बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट

राम रहीमच्या शिक्षेवर आनंद व्यक्त करणाऱ्यांमध्ये कॉमेडियन किकू शारदाचाही समावेश आहे.

By: | Last Updated: > Tuesday, 29 August 2017 1:30 PM
Ram Rahim Gets 20 Years In Jail, comedian Kiku Sharda’s tweet

मुंबई : बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा झाल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला. बाबा राम रहीमची काळी कृत्यं जगासमोर आल्यानंतर, धर्माच्या आड सुरु असलेला धंदा बंद झाला आणि साध्वींना न्याय मिळाला, अशा शब्दात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राम रहीमच्या शिक्षेवर आनंद व्यक्त करणाऱ्यांमध्ये कॉमेडियन किकू शारदाचाही समावेश आहे.

राम रहीमला 20 वर्षांच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेची घोषणा झाल्यानंतर कीकू शारदाने खिल्ली उडवणारं ट्वीट केलं आहे. किकू शारदाने लिहिलं आहे की, एन्जॉईंग अ पीसफूल चायनीज मिल विद नो मोनोसोडियम ग्लूटामेट. (Enjoying a peaceful Chinese meal with no monosodium glutamate.)

इथे मोनोसोडियम ग्लूटामेट म्हणजे MSG हे बाबा राम रहीमच्या संदर्भात लिहिलं आहे. राम रहीम स्वत:ला मेसेंजर ऑफ गॉड म्हणजे MSG म्हणत असे. कीकूच्या ट्वीटमध्ये ज्या मोनोसोडियम ग्लूटामेटचा उल्लेख आहे, ते बहुतांश वेळा चायनीज फूडमध्ये चव वाढवण्यासाठी मिसळलं जातं.

किकू आणि बाबा राम रहीमचा वाद
‘कॉमेडी नाईट्स विद कपिल’ शोमध्ये एकदा किकू शारदाने राम रहीमचा वेश परिधान करुन त्याच्या एका सिनेमातील दृश्याची नक्कल केली होती. यानंतर बाबा राम रहीमचे समर्थक भडकले होते. किकूने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला होता. बाबा राम रहीमने किकू शारदाला नोटीसही पाठवली होती. यानंतर किकूवर गुन्हाही दाखल झाला होता. त्याला अटक करुन एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली होती.

चंद्रमुखी चौटालाच्या ट्वीटनंतर किकूवर अभिनंदनाचा वर्षाव
बाबा राम रहीमच्या अटकेनंतर कीकू शारदावर ट्विटवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याची सुरुवात एफआयआर फेम चंद्रमुखी चौटाला अर्थात कविता कौशिकने केली. कविताने बाबा राम रहीमच्या अटकेनंतर किकूला ट्वीट करुन शुभेच्छा दिल्या. तिचं ट्वीट तुफान रिट्वीट झालंच, शिवाय व्हायरल पण झालं.

कविताने किकूला टॅग करताना ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “किकू शारदा तुला माहित आहे ना, माझा आवडता डायलॉग कोणता आहे? आज…खुश तो बहुत होंगे तुम!” कविताने ट्वीट करताच किकूला शुभेच्छा देण्यासाठी ट्विटवर चढाओढ लागली. किकू आणि कविताचे फॉलोअर्स किकूला शुभेच्छा देऊ लागले.

Tv And Theatre News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Ram Rahim Gets 20 Years In Jail, comedian Kiku Sharda’s tweet
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!
पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!

कोल्हापूर : सच्चे चाहते आवडत्या हिरो-हिरोईनसाठी काहीही करायला तयार

फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!
फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!

कोल्हापूर : ‘अजूनही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा आहे,’ हे वाक्य आहे

'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर
'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर

मुंबई : ‘कुमकुम’ मालिकेतून घराघरात पोहचलेली टीव्ही अभिनेत्री

फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?
फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माच्या अडचणींचा सिलसिला कायम आहे. ‘द

'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला
'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला

मुंबई : गेल्या दीड वर्षापासून ‘झी मराठी’ वाहिनीवर गाजणारी

टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार
टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार

मुंबई : क्या होगा निम्मो का, नच बलिए, लव्ह का है इंतजार यासारख्या

सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद
सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक

वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का
वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का

मुंबई : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ ही मालिका

पुन्हा शूटिंग रद्द, कपिल शर्माला दारुचं व्यसन?
पुन्हा शूटिंग रद्द, कपिल शर्माला दारुचं व्यसन?

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माने पुन्हा एकदा शोचं चित्रीकरण रद्द केलं

जेनिफर विंगेट इंटिमेट सीन करताना दिसणार!
जेनिफर विंगेट इंटिमेट सीन करताना दिसणार!

मुंबई : छोट्या पदड्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर विंगेट लवकरच