बिपाशा आणि करणच्या ‘त्या’ जाहिरातीवर सलमानचा आक्षेप

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि तिचा पती करण सिंह ग्रोवरच्या कांडोमच्या जाहिरातीमुळे चर्चेत आहे. पण याच जाहिरातीवर अभिनेता सलमान खानने आक्षेप घेतला आहे. सलमानने ‘बिग बॉस’ शो दरम्यान ही जाहिरात प्रक्षेपित करु नये, अशी मागणी केली आहे.

बिपाशा आणि करणच्या ‘त्या’ जाहिरातीवर सलमानचा आक्षेप

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि तिचा पती करण सिंह ग्रोवरच्या कांडोमच्या जाहिरातीमुळे चर्चेत आहे. पण याच जाहिरातीवर अभिनेता सलमान खानने आक्षेप घेतला आहे. सलमानने ‘बिग बॉस’ शो दरम्यान ही जाहिरात प्रक्षेपित करु नये, अशी मागणी केली आहे.

सलमानच्या मते, ‘बिग बॉस’ हा शो सर्व वयोगटातील व्यक्ती पाहातात. लहान मुलांमध्येही हा शो लोकप्रिय आहे. त्यामुळे या शोदरम्यान कांडोमची ही जाहिरात प्रक्षेपित करु नये, असा सल्ला सलमानने दिला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सलमानने हा सल्ला सध्या ब्रॉडकास्टर्सना दिला आहे. पण कलर्स वाहिनीच्या कोणाशीही याबाबत चर्चा झालेली नसल्याचे वृत्त आहे.

शोमधील ब्रेक दरम्यान कांडोमची जाहिरात प्रसारित करण्याने लहान मुलांच्या मनावर याचा विपरीत परिणाम होईल. आणि त्याला जाहिरातीमुळे शोची जनमानसातील प्रतिमा डागाळत आहे. त्यामुळे ही जाहिरात प्रसारित करु नये, असा आग्रह त्याने धरला आहे.

दरम्यान, शोच्या कंटेटवरुनही अनेक वाद सुरुवातीपासूनच आहेत. काही दिवसांपूर्वीच शोमधील बंदगी आणि पुनीश यांच्या इंटीमेसी सीनमुळे महिती आणि प्रसारण मंत्रालयाने बिग बॉसच्या निर्मात्यांना झापलं होतं.

यावरुनही सलमान खानकडूनही शोमध्ये शूट होणाऱ्या सीनवरुन निर्मात्यांना कानपिचक्या दिल्या. हा शो त्याच्या कुटुंबियांसह अनेक प्रेक्षक पाहतात, त्यामुळे असे सीन टाळण्याच्या सूचना त्याने यावेळी दिल्या होत्या.

टीव्ही-नाटक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: salman khan asked broadcasters to stop condom advertisement-in-bigg-boss
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV