'बिग बॉस' मराठीत, रितेश देशमुख सूत्रसंचालक?

बिग बॉस आणि वाद हे जणू समीकरणच आहे. त्यामुळे मराठीत हा शो आल्यावर कोणकोणते कलाकार यामध्ये सहभागी होणार, त्यांच्यातही टोकाचे वाद रंगणार का, असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

'बिग बॉस' मराठीत, रितेश देशमुख सूत्रसंचालक?

मुंबई : हिंदी टेलिव्हिजन विश्वात खळबळ माजवणारा रिअॅलिटी शो 'बिग बॉस' आता मराठीत येणार आहे. बिग बॉसच्या अकराव्या पर्वाच्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने याची अधिकृत घोषणा केली. विशेष म्हणजे मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखच्या हाती शोची सूत्रं  दिली जाण्याची शक्यता आहे.
BIG BOSS 11 : शिल्पा शिंदे विजेती, हीना खानवर मात

अभिनेत्री शिल्पा शिंदेने 'बिग बॉस 11'चं विजेतेपद पटकावलं. हीना खान, विकास गुप्ता, पुनिश शर्मा यांना टक्कर देत शिल्पाने जेतेपद मिळवलं. 'कलर्स मराठी' वाहिनीवर येत्या दोन महिन्यात हा कार्यक्रम सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिग बॉसचा सेट लोणावळ्यात तयार असल्यामुळे तिथेच शूटिंग होण्याची चिन्हं आहेत.
व्हायरल सत्य : शिल्पा शिंदे विकास गुप्तासोबत लग्न करणार?

रितेश देशमुखने 'लय भारी' या चित्रपटातून मराठी सिनेविश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर 'विकता का उत्तर' या टीव्ही शोचं सूत्रसंचालनही त्याने केलं होतं. त्यामुळे बिग बॉस मराठीचा होस्ट म्हणून रितेशला पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरेल.

बिग बॉस आणि वाद हे जणू समीकरणच आहे. त्यामुळे मराठीत हा शो आल्यावर कोणकोणते कलाकार यामध्ये सहभागी होणार, त्यांच्यातही टोकाचे वाद रंगणार का, असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
मराठी कलाकार उत्तम, पण त्यांना 'मी' पणा जास्त : शिल्पा शिंदे

रविवारी रात्री 'बिग बॉस 11' च्या ग्रँड फिनालेमध्ये शिल्पाला ट्रॉफीसह 44 लाख रुपयांचं पारितोषिक प्रदान करण्यात आलं. अभिनेत्री हीना खान उपविजेती ठरली. विकास गुप्ताला तिसऱ्या तर पुनिश शर्माला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
अर्शी खान 'बिग बॉस'मधून मिळालेले पैसे अनाथ मुलांसाठी खर्च करणार

बिग बॉसच्या अकरा पर्वांच्या इतिहासात पहिल्यांदाच मराठी स्पर्धक विजेता ठरला. त्यानंतर लागलीच 'मराठी बिग बॉस'ची घोषणा हा योगायोग म्हणावा लागेल. मराठी प्रेक्षकांचा बिग बॉसला वाढता प्रतिसाद पाहून ही जुळवाजुळव सुरु केल्याचं म्हटलं जातं.

टीव्ही-नाटक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Salman Khan confirms Bigg Boss Marathi to start soon, Riteish Deshmukh may host latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV