प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'सावधान इंडिया' लवकरच बंद होणार!

गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा थ्रिलर शो लवकरच बंद होणार आहे. चांगल्या टीआरपी रेटिंगनंतरही निर्मात्यांनी हा शो बंद करण्याचा निर्णय घेतलाय.

प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'सावधान इंडिया' लवकरच बंद होणार!

मुंबई : गुन्हेगारीवर आधारित प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'सावधान इंडिया'च्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा थ्रिलर शो लवकरच बंद होणार आहे.

चांगल्या टीआरपी रेटिंगनंतरही निर्मात्यांनी हा शो बंद करण्याचा निर्णय घेतलाय. चॅनलने या शोची शुटिंग तातडीने बंद करण्याचे आदेश दिल्याचंही वृत्त आहे.

'सावधान इंडिया' टीव्हीवर गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रिय असणारा शो आहे. हा शो पहिल्यांदा सहा वर्षांपूर्वी प्रसारित झाला होता आणि या शोचे आतापर्यंत 2500 पेक्षा जास्त एपिसोड रिलीज झाले आहेत. या शोमधील क्राईम स्टोरींबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत.

या शोची सुरुवात लाईफ ओके चॅनलवर झाली होती. मात्र गेल्या वर्षी सुरु झालेल्या स्टार भारतने ‘सावधान इंडिया’ चे हक्क विकत घेतले. अभिनेता सुशांत सिंह या शोचा होस्ट आहे. तर मनीष बहल, पुजा गौर, शिवानी तोमर, हितेश तेजवानी आणि दिव्या दत्तासारख्या टीव्ही स्टारनेही हा शो होस्ट केला आहे.

दरम्यान, चॅनलकडून हा शो बंद होणार असल्याची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र हा शो तातडीने बंद होणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे.

टीव्ही-नाटक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: sav
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV