श्वेता तिवारीचा दुसरा संसारही मोडण्याच्या मार्गावर?

श्वेता आणि अभिनव एका शोच्या सेटवर भेटले होते. लग्नाआधी दोघांनी एकमेकांना तीन वर्ष डेट केलं होतं. त्यानंतर 2013 मध्ये दोघांनी लग्न केलं.

By: | Last Updated: > Monday, 16 October 2017 11:10 AM
Shweta Tiwari and Abhinav Kohli are facing problems in their marrriage

मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या शोसाठी चर्चेत असते. पण श्वेता सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. श्वेता तिवारी आणि तिचा पती अभिनव कोहली यांच्यात आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे.

हे दोघे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करत आहेत. दोघांमध्ये एकमेकांच्या करिअरबाबत वाद होत आहेत. अभिनवला श्वेताचं यश पचत नाही, अशी चर्चा आहे.

“मात्र श्वेता आणि माझ्यात सगळं आलबेल आहे. श्वेताच्या यशामुळे मी कधीच असुरक्षित नव्हतो. आम्ही दोघे आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत असून आनंदात आहोत,” असं स्पष्टीकरण अभिनवने दिलं.

श्वेता आणि अभिनव एका शोच्या सेटवर भेटले होते. लग्नाआधी दोघांनी एकमेकांना तीन वर्ष डेट केलं होतं. त्यानंतर 2013 मध्ये दोघांनी लग्न केलं. दोघांना रेयांश नावाचा एक मुलगाही आहे.

श्वेता तिवारीचं हे दुसरं लग्न आहे. याआधी श्वेताने राजा चौधरीशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 9 वर्षानंतर 2007 मध्ये तिने घटस्फोट घेतला होता. “राजा चौधरी कायम मारहाण करत असे,” असा आरोप श्वेताने केला होता. या दोघांना पलक ही मुलगी आहे. ती श्वेता आणि अभिनवसोबतच राहते.

Tv And Theatre News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Shweta Tiwari and Abhinav Kohli are facing problems in their marrriage
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

बिग बॉस 11 : शिल्पा शिंदे-विकास गुप्ता लग्नाच्या बेडीत अडकणार?
बिग बॉस 11 : शिल्पा शिंदे-विकास गुप्ता लग्नाच्या बेडीत अडकणार?

मुंबई : बिग बॉसचा अकरावा सीझन सध्या अतिशय चर्चेत आहे. कधी बंदगी आणि

सितारा देवी यांना गुगलचा डूडलद्वारे सलाम!
सितारा देवी यांना गुगलचा डूडलद्वारे सलाम!

मुंबई: कथ्थकच्या सच्च्या उपासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, प्रसिद्ध

हसणं थांबणार, 'चला हवा येऊ द्या' निरोप घेणार!
हसणं थांबणार, 'चला हवा येऊ द्या' निरोप घेणार!

मुंबई : ‘कसं काय मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे,’ निलेश साबळेचा हा

रोमँटिक सीनच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीच्या साडीला आग!
रोमँटिक सीनच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीच्या साडीला आग!

मुंबई : ‘अॅण्ड टीव्ही’ या चॅनलवरील ‘अग्निफेरा’ या मालिकेतील

नावासारखाच सरळमार्गी विनोदवीर: शरद तळवलकर!
नावासारखाच सरळमार्गी विनोदवीर: शरद तळवलकर!

मुंबई: कॉमेडीच्या नावे ओढून ताणून पांचट विनोद करुन, कृत्रिम हास्य

वसगडेकरांचा 'तुझ्यात जीव रंगला'ला नेमका विरोध का?
वसगडेकरांचा 'तुझ्यात जीव रंगला'ला नेमका विरोध का?

कोल्हापूर: ‘तुझ्यात जीव रंगला’ या झी मराठीवरील प्रसिद्ध

अक्षयकुमारच्या 'बजाओ' कमेंटवर पत्नी ट्विंकल खन्ना म्हणते...
अक्षयकुमारच्या 'बजाओ' कमेंटवर पत्नी ट्विंकल खन्ना म्हणते...

मुंबई : कॉमेडियन मल्लिका दुआ आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्यात सुरु

'तुझ्यात जीव रंगला'चं शूटिंग थांबवा, गावकऱ्यांची मागणी
'तुझ्यात जीव रंगला'चं शूटिंग थांबवा, गावकऱ्यांची मागणी

कोल्हापूर : प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ‘झी मराठी’वरील

मोदींची मिमिक्री महागात, कॉमेडियन श्याम रंगीला एलिमिनेट
मोदींची मिमिक्री महागात, कॉमेडियन श्याम रंगीला एलिमिनेट

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी

अक्षय, तुझ्या मुलीला कोणी 'ती' कमेंट केली तर? : मल्लिका
अक्षय, तुझ्या मुलीला कोणी 'ती' कमेंट केली तर? : मल्लिका

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारने ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर