मोदींची मिमिक्री महागात, कॉमेडियन श्याम रंगीला एलिमिनेट

प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल यांनी श्याम रंगीलाची बाजू उचलून धरली आहे. 'नेत्यांची मिमिक्री करण्यात काहीच हरकत नाही, फक्त तो निखळ विनोद असायला हवा.' असं पाल म्हणाले.

By: | Last Updated: > Friday, 27 October 2017 2:09 PM
Shyam Rangeela eliminated from The Great Indian Laughter Challenge after Mimicry of Narendra Modi latest update

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची मिमिक्री करण्यासाठी प्रसिद्ध असलेला विनोदवीर श्याम रंगीला याला नुकताच ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. विशेष म्हणजे एपिसोडमध्ये त्याने केलेली मिमिक्री ऑन एअर दाखवली जाणार नाही.

मोदी आणि राहुल गांधी यांची नक्कल करता येणार नाही, तुला शोसाठी नवीन कंटेंट तयार करावा लागेल, असं श्यामला सांगण्यात आलं. कंटेंट तयार करण्यासाठी त्याला फारसा वेळही देण्यात आला नाही. पर्यायाने त्याचं एलिमिनेशन करण्यात आलं.

अक्षय, तुझ्या मुलीला कोणी ‘ती’ कमेंट केली तर? : मल्लिका

या प्रकारामुळे 22 वर्षांचा श्याम प्रचंड चिडला असून त्याने कार्यक्रमाच्या टीमवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘मी मोदींची नक्कल करण्यात पटाईत असल्याचं त्यांना माहित होतं. मग शोमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रणच का दिलं.’ असं श्याम रंगीला म्हणतो.

‘मोदींची नक्कल करता येणार नाही, हे त्यांनी आधी सांगितलं होतं. सुरुवातीला राहुल गांधींची फिरकी घेतल्यास चॅनेलची हरकत नव्हती. मात्र अचानक त्यांनी राहुल किंवा मोदी, या कोणाचीही मिमिक्री करता येणार नाही, असं सांगितलं. मी पंतप्रधानांना शिव्या तर घातल्या नव्हत्या. मी फक्त मिमिक्री केली. त्यात काय वावगं?’ असा सवाल श्यामने केला आहे.

प्रसिद्ध कॉमेडियन आणि ‘द ग्रेट इंडियन..’च्या पहिल्या पर्वाचा विजेता सुनील पाल यांनी श्याम रंगीलाची बाजू उचलून धरली आहे. ‘नेत्यांची मिमिक्री करण्यात काहीच हरकत नाही, फक्त तो निखळ विनोद असायला हवा.’ असं पाल म्हणाले.

‘मी नाना पाटेकर, इरफान खान यासारख्या अनेक अभिनेत्यांची मिमिक्री केली आहे, पण कोणी कधीच आक्षेप घेतला नाही.’ असं सुनील पाल यांनी सांगितलं. ‘चॅनेलने हा एपिसोड दाखवायला हवा होता. मला खात्री आहे मोदींनाही कुठला आक्षेप नसता. मोदींविषयी त्याने कोणताही अपशब्द काढला नाही, की त्यांना काही वाईट-साईट बोलला नाही’ असं पाल म्हणाले.

श्याम रंगीला कोण आहे?

राजस्थानचा रहिवासी असलेला श्याम रंगीला हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. राजस्थानातील श्री गंगानगर जिल्ह्यातल्या रायसिंहनगरमधील मोहकमवाला गावात लहानाचा मोठा झाला. 2004 मध्ये शाळेतूनच त्याने मिमिक्रीला सुरुवात केली. लहानपणापासूनच त्याला कॉमेडियन होण्याची इच्छा होती. आपलं स्वप्न साकार करण्यासाठी त्याने मिमिक्री करणं सुरु केलं.

यूट्यूबवर 30 हजार फॉलोवर्स

श्याम रंगीलाचं स्वतःचं यूट्यूब चॅनल असून त्याचे जवळपास 30 हजार फॉलोवर्स आहेत. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ मधून एलिमिनेट झाल्यानंतरही त्याच्या प्रसिद्धीत तसूभरही फरक पडलेला नाही. त्याचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Tv And Theatre News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Shyam Rangeela eliminated from The Great Indian Laughter Challenge after Mimicry of Narendra Modi latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

बिग बॉस 11 : शिल्पा शिंदे-विकास गुप्ता लग्नाच्या बेडीत अडकणार?
बिग बॉस 11 : शिल्पा शिंदे-विकास गुप्ता लग्नाच्या बेडीत अडकणार?

मुंबई : बिग बॉसचा अकरावा सीझन सध्या अतिशय चर्चेत आहे. कधी बंदगी आणि

सितारा देवी यांना गुगलचा डूडलद्वारे सलाम!
सितारा देवी यांना गुगलचा डूडलद्वारे सलाम!

मुंबई: कथ्थकच्या सच्च्या उपासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, प्रसिद्ध

हसणं थांबणार, 'चला हवा येऊ द्या' निरोप घेणार!
हसणं थांबणार, 'चला हवा येऊ द्या' निरोप घेणार!

मुंबई : ‘कसं काय मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे,’ निलेश साबळेचा हा

रोमँटिक सीनच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीच्या साडीला आग!
रोमँटिक सीनच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीच्या साडीला आग!

मुंबई : ‘अॅण्ड टीव्ही’ या चॅनलवरील ‘अग्निफेरा’ या मालिकेतील

नावासारखाच सरळमार्गी विनोदवीर: शरद तळवलकर!
नावासारखाच सरळमार्गी विनोदवीर: शरद तळवलकर!

मुंबई: कॉमेडीच्या नावे ओढून ताणून पांचट विनोद करुन, कृत्रिम हास्य

वसगडेकरांचा 'तुझ्यात जीव रंगला'ला नेमका विरोध का?
वसगडेकरांचा 'तुझ्यात जीव रंगला'ला नेमका विरोध का?

कोल्हापूर: ‘तुझ्यात जीव रंगला’ या झी मराठीवरील प्रसिद्ध

अक्षयकुमारच्या 'बजाओ' कमेंटवर पत्नी ट्विंकल खन्ना म्हणते...
अक्षयकुमारच्या 'बजाओ' कमेंटवर पत्नी ट्विंकल खन्ना म्हणते...

मुंबई : कॉमेडियन मल्लिका दुआ आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्यात सुरु

'तुझ्यात जीव रंगला'चं शूटिंग थांबवा, गावकऱ्यांची मागणी
'तुझ्यात जीव रंगला'चं शूटिंग थांबवा, गावकऱ्यांची मागणी

कोल्हापूर : प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ‘झी मराठी’वरील

अक्षय, तुझ्या मुलीला कोणी 'ती' कमेंट केली तर? : मल्लिका
अक्षय, तुझ्या मुलीला कोणी 'ती' कमेंट केली तर? : मल्लिका

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारने ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर

सब टीव्हीचे संस्थापक गौतम अधिकारी यांचं निधन
सब टीव्हीचे संस्थापक गौतम अधिकारी यांचं निधन

मुंबई: टीव्ही क्षेत्रातील दिग्गज नाव आणि ‘अधिकारी ब्रदर्स’चे श्री