स्मृती इराणींची 'पहरेदार पिया की'विरोधात कारवाई, मालिका बंद होणार?

‘पहरेदार पिया की’ ही मालिका कथानकामुळे सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. एका 18 वर्षांच्या तरुणीचं 9 वर्षांच्या मुलासोबत लग्न होतं.

By: | Last Updated: > Friday, 11 August 2017 2:45 PM
Smriti Irani takes action against Pehredaar Piya Ki serial, sends petition to BCCC

मुंबई : सोनी टीव्हीवरील ‘पहरेदार पिया की’ या मालिकेची सध्या जोरदार चर्चा आहे. ही मालिका तातडीने बंद करा, अशी मागणी केली जात आहे. आता माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी लोकांच्या मागणीवर विचार करत ब्रॉडकास्टिंग कंटेंट कम्पलेंट्स काऊन्सिलकडे हे प्रकरण सोपवलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बीसीसीसीला या मालिकेवर तातडीने कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.

‘पहरेदार पिया की’ मालिकेविषयीने लोकांमध्ये फार रोष आहे. मानसी जैन नावाच्या एका तरुणीने change.org वेबसाईटवर मालिकेवर बंदी घालण्यायाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आतापर्यंत सुमारे 50 हजारांपेक्षा जास्त लोकांनी स्वाक्षरी केली आहे.

‘पहरेदार पिया की मालिकेत एका 9 वर्षाच्या मुलाला त्याच्या दुप्पट 18 वर्ष वयाच्या मुलीचा पाठलाग करताना, तिच्या भांगात कुंकू भरताना दाखवलं आहे. ही मालिका रात्री 8:30 वाजता सोनी टीव्हीवर प्रसारित होते, हा फॅमिली टाईम असतो. या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या मानसिकेतवर परिणाम होईल. ही मालिका पाहून आमच्या मुलांच्या मनावर परिणाम होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. मालिका बंद करण्यासाठी या याचिकवर स्वाक्षरी करा, असं या तरुणीने याचिकेत म्हटलं आहे. हीच याचिका स्मृती इराणी यांना पाठवण्यात आली आहे.

‘पहरेदार पिया की’ ही मालिका कथानकामुळे सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. एका 18 वर्षांच्या तरुणीचं 9 वर्षांच्या मुलासोबत लग्न होतं. नुकत्याच झालेल्या काही एपिसोडमध्ये सुहागरात तसंच कुंकू लावण्याचे सीन दाखवले होते. यावर प्रेक्षकांनी आक्षेप नोंदवला होता.

Tv And Theatre News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Smriti Irani takes action against Pehredaar Piya Ki serial, sends petition to BCCC
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!
पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!

कोल्हापूर : सच्चे चाहते आवडत्या हिरो-हिरोईनसाठी काहीही करायला तयार

फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!
फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!

कोल्हापूर : ‘अजूनही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा आहे,’ हे वाक्य आहे

'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर
'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर

मुंबई : ‘कुमकुम’ मालिकेतून घराघरात पोहचलेली टीव्ही अभिनेत्री

फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?
फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माच्या अडचणींचा सिलसिला कायम आहे. ‘द

'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला
'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला

मुंबई : गेल्या दीड वर्षापासून ‘झी मराठी’ वाहिनीवर गाजणारी

टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार
टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार

मुंबई : क्या होगा निम्मो का, नच बलिए, लव्ह का है इंतजार यासारख्या

सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद
सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक

बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट
बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट

मुंबई : बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा

वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का
वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का

मुंबई : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ ही मालिका

पुन्हा शूटिंग रद्द, कपिल शर्माला दारुचं व्यसन?
पुन्हा शूटिंग रद्द, कपिल शर्माला दारुचं व्यसन?

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माने पुन्हा एकदा शोचं चित्रीकरण रद्द केलं