'बिग बॉस 11'साठी ढिंच्यॅक पूजाची 80 लाखांची मागणी?

ढिंच्यॅक पूजाची 'सेल्फी मैने ले ली आज', 'दिलों का शूटर है मेरा स्कूटर', 'बापू दे दे थोडा कॅश' यासारखी गाणी इंटरनेटवर व्ह्यूज खेचत आहेत. त्यामुळे पूजाने आपली किंमत वाढवून घेतली

By: | Last Updated: > Thursday, 28 September 2017 3:42 PM
Social media queen Dhinchak Pooja asked for 80 lacs to participate in Bigg Boss 11 latest update

मुंबई : ‘बिग बॉस’चा 11 वा सिझन येत्या एक ऑक्टोबरपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या पर्वात सहभागी होण्यासाठी सोशल मीडिया क्वीन ढिंच्यॅक पूजाला आमंत्रण मिळालं होतं. मात्र तिने त्यासाठी 80 लाख रुपये मागितल्याची चर्चा आहे.

बिग बॉस या रिअॅलिटी शोचं प्रत्येक पर्व शो सुरु होण्याआधीपासूनच गाजत असतं. प्रत्यक्ष शो सुरु झाल्यानंतर होणाऱ्या काँट्रोव्हर्सीज तर वेगळ्याच. कोणकोणत्या सेलिब्रेटींना बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळणार, याबाबत चाहते अटकळ बांधत असतात. यावेळी सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या ढिंच्यॅक पूजाला शोमध्ये सहभागाचं आमंत्रण होतं.

ढिंच्यॅक पूजाची ‘सेल्फी मैने ले ली आज’, ‘दिलों का शूटर है मेरा स्कूटर’, ‘बापू दे दे थोडा कॅश’ यासारखी गाणी इंटरनेटवर व्ह्यूज खेचत आहेत. त्यामुळे पूजाने आपली किंमत वाढवून घेतली. ढिंच्यॅक पूजाची लोकप्रियता पाहून तिने केलेल्या 80 लाखांच्या मागणीवर निर्मात्यांनी विचारही केला. मात्र मानधनावरुन बोलणी फिस्कटल्यामुळे पूजाने नकार कळवला आहे.

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच यावेळीही बिग बॉसचं सूत्रसंचालन करणार आहे. या शोमध्ये अभिनेता गौरव गेरा हा पहिला ‘पडोसी’ असेल, अशी घोषणा निर्मात्यांनी केली होती. त्यानंतर शोमध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

Tv And Theatre News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Social media queen Dhinchak Pooja asked for 80 lacs to participate in Bigg Boss 11 latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

अभिनेता राम कपूर विरोधात फसवणुकीचा गुन्हा
अभिनेता राम कपूर विरोधात फसवणुकीचा गुन्हा

मुंबई : ‘बडे अच्छे लगते है’ फेम अभिनेता राम कपूर विरोधात मुंबईतील

श्वेता तिवारीचा दुसरा संसारही मोडण्याच्या मार्गावर?
श्वेता तिवारीचा दुसरा संसारही मोडण्याच्या मार्गावर?

मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या शोसाठी चर्चेत असते.

अनुपम खेर एफटीआयआयचे नवे अध्यक्ष
अनुपम खेर एफटीआयआयचे नवे अध्यक्ष

नवी दिल्ली : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची

... म्हणून केबीसीच्या सेटवर अमिताभ बच्चन भावुक झाले!
... म्हणून केबीसीच्या सेटवर अमिताभ बच्चन भावुक झाले!

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ शो सुरु

बिग बॉसच्या घरात हायवोल्टेज ड्रामा, झुबेरची सलमानविरोधात तक्रार
बिग बॉसच्या घरात हायवोल्टेज ड्रामा, झुबेरची सलमानविरोधात तक्रार

मुंबई : ‘बिग बॉस सीझन 11’ च्या पहिल्या आठवड्यात घराबाहेर पडलेला

INT मध्ये किर्ती कॉलेजची 'ईव्हॉल्यूशन ए क्वेश्चनमार्क' एकांकिका अव्वल
INT मध्ये किर्ती कॉलेजची 'ईव्हॉल्यूशन ए क्वेश्चनमार्क' एकांकिका...

मुंबई : यंदाच्या आयएनटी एकांकिका स्पर्धेवर दादरच्या कीर्ती

‘मल्लिका ए गझल’ बेगम अख्तर यांना गुगलचा डूडलद्वारे सलाम
‘मल्लिका ए गझल’ बेगम अख्तर यांना गुगलचा डूडलद्वारे सलाम

मुंबई: ‘मल्लिका ए गझल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेगम अख्तर यांना

रिंकू राजगुरु सध्या काय करते?
रिंकू राजगुरु सध्या काय करते?

अकलूज (सोलापूर) : ‘एबीपी माझा’च्या ‘रंग माझा वेगळा’ ह्या

KBC 9 मध्ये 1 कोटी जिंकणारी पहिली महिला!
KBC 9 मध्ये 1 कोटी जिंकणारी पहिली महिला!

मुंबई : ‘कोन बनेगा करोडपती’च्या 9 व्या मोसमात झारखंडची अनामिका

रिंकू राजगुरु 'रंग माझा वेगळा'च्या यंदाच्या पर्वाची विजेती!
रिंकू राजगुरु 'रंग माझा वेगळा'च्या यंदाच्या पर्वाची विजेती!

मुंबई : एबीपी माझावरील ‘रंग माझा वेगळा’च्या या पर्वाची विनर ठरली