वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का

सोमवारी या मालिकेच्या सेटवर शांतता होती. त्यामुळे सरकारने या मालिकेवर बंदी घालण्याचा निर्णय तर घेतला नाही ना, अशी शंका वर्तवली जात आहे.

By: | Last Updated: > Tuesday, 29 August 2017 12:06 PM
Sony TV takes Pehredaar Piya Ki off air; shoot stopped, cast and crew in shock

मुंबई : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आहे. ही मालिका अखेर बंद करण्यात आली आहे. मालिकेचा एपिसोड काल (28 ऑगस्ट) टेलिकास्ट झाला नाही.

मालिका अचानक बंद झाल्याने मालिकेची कलाकार आणि क्रू यांना धक्का बसला आहे. मालिकेत लीप दाखवला जाईल असा विचार त्यांनी केला होता. परंतु मालिकाच बंद झाल्याने सगळ्यांना झटका बसला आहे.

सोमवारी या मालिकेच्या सेटवर शांतता होती. त्यामुळे सरकारने या मालिकेवर बंदी घालण्याचा निर्णय तर घेतला नाही ना, अशी शंका वर्तवली जात आहे.

या मालिकेत 12 वर्षांचा लीप येईल, असं वृत्त दोन दिवसांपूर्वी होतं. या लीपनंतर 9 वर्षांचा मुलगा 21 वर्षाचा होईल, जेणेकरुन ‘बालविवाह’चा आक्षेप आपोआपच निघून जाईल. परंतु ताज्या माहितीनुसार, मालिकेचं चित्रीकरण थांबलं आहे.

वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ मालिकेविरोधात अखेर कारवाई

‘पहरेदार पिया की’ ही मालिका कथानकामुळे सुरुवातीपासूनच वादात अडकली आहे. एका 18 वर्षांच्या तरुणीचं 9 वर्षांच्या मुलासोबत लग्न होतं. नुकत्याच झालेल्या काही एपिसोडमध्ये सुहागरात तसंच कुंकू लावण्याचे सीन दाखवले होते. यावर प्रेक्षकांनी आक्षेप नोंदवला होता.

‘पहरेदार पिया की’ मालिकेविषयी रोष निर्माण झाल्याने मानसी जैन नावाच्या एका तरुणीने change.org वेबसाईटवर याचिका दाखल केली होती. ही मालिका तातडीने बंद करा अशी मागणी या याचिकेद्वारे माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे करण्यात आली होती. यानंतर स्मृती इराणी यांनी मागणीचा विचार करत ब्रॉडकास्टिंग कन्टेंट कम्पलेंट्स काऊन्सिलकडे हे प्रकरण सोपवून बीसीसीसीला या मालिकेवर तातडीने कारवाई करण्याचा आदेश दिला होता.

स्मृती इराणींची ‘पहरेदार पिया की’विरोधात कारवाई, मालिका बंद होणार?

बीसीसीसीने सोनी वाहिनीला मालिकेची वेळ बदलण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे आता ही मालिका रात्री 8.30 ऐवजी रात्री 10.30 वाजता प्रसारित होत होती. याशिवाय मालिका सुरु असताना ‘ही मालिका बालविवाहाला प्रोत्साहन देत नाही’, अशा आशयाची पट्टी चालवावी, असे निर्देशही देण्यात आले होते.

आता ही मालिकाच बंद करण्यात आली आहे.

Tv And Theatre News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Sony TV takes Pehredaar Piya Ki off air; shoot stopped, cast and crew in shock
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!
पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!

कोल्हापूर : सच्चे चाहते आवडत्या हिरो-हिरोईनसाठी काहीही करायला तयार

फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!
फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!

कोल्हापूर : ‘अजूनही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा आहे,’ हे वाक्य आहे

'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर
'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर

मुंबई : ‘कुमकुम’ मालिकेतून घराघरात पोहचलेली टीव्ही अभिनेत्री

फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?
फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माच्या अडचणींचा सिलसिला कायम आहे. ‘द

'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला
'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला

मुंबई : गेल्या दीड वर्षापासून ‘झी मराठी’ वाहिनीवर गाजणारी

टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार
टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार

मुंबई : क्या होगा निम्मो का, नच बलिए, लव्ह का है इंतजार यासारख्या

सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद
सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक

बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट
बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट

मुंबई : बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा

पुन्हा शूटिंग रद्द, कपिल शर्माला दारुचं व्यसन?
पुन्हा शूटिंग रद्द, कपिल शर्माला दारुचं व्यसन?

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माने पुन्हा एकदा शोचं चित्रीकरण रद्द केलं

जेनिफर विंगेट इंटिमेट सीन करताना दिसणार!
जेनिफर विंगेट इंटिमेट सीन करताना दिसणार!

मुंबई : छोट्या पदड्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर विंगेट लवकरच