बिग बॉसचं लोणावळ्यातील शूटिंग बंद होणार?

पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवत घरातील सांडपाणी थेट नदीत सोडण्यात आल्याचा आरोप बिग बॉसवर ठेवण्यात आला आहे.

बिग बॉसचं लोणावळ्यातील शूटिंग बंद होणार?

लोणावळा : एकापेक्षा एक स्पर्धक आणि अजब टास्कमुळे कलर्स टीव्हीवरील 'बिग बॉस'चा अकरावा सीझन चर्चेत आहे. आता 'बिग बॉस' शो पुन्हा वादात अडकला आहे. शोच्या चित्रीकरणाचा परवाना रद्द करा, अशी शिफारस लोणावळा नगरपरिषदेतर्फे करण्यात आली आहे.

लोणावळास्थित बिग बॉसच्या घरासाठी अनधिकृत बांधकाम करण्यात आलं आहे. पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवत घरातील सांडपाणी थेट नदीत सोडण्यात आल्याचा आरोप बिग बॉसवर ठेवण्यात आला आहे.

तीन वर्ष होऊनही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. तसंच ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर उभारलेला नाही. याशिवाय अग्निशमन यंत्रणा तसंच कर्मचारी इथे नाहीत.

त्यामुळे बिग बॉसच्या चित्रीकरणाचा परवाना रद्द करावा, अशी शिफारस लोणावळा नगरपरिषदेच्या चौकशी अहवालात करण्यात आली आहे.

टीव्ही-नाटक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Stop shooting licenses of Bigg Boss’s, recommends Lonawala Nagar Parishad
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV