...म्हणून सुनील ग्रोव्हर कपिलसोबत काम करण्यास तयार?

By: | Last Updated: > Wednesday, 5 April 2017 1:10 PM
sunil grover back to shoot on the kapil sharma show

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील वादाची सर्वत्र चर्चा रंगली होती. या वादानंतर सुनीलनेही कपिलच्या शोला कायमचा रामराम ठोकल्याचं वृत्त होतं. पण आता सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा लवकरच एकत्र काम करण्याचे संकेत मिळत आहेत.

आगामी दोन एपिसोडमध्ये कपिलसोबत सुनील ग्रोव्हरही काम करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चॅनेलच्या सूत्रांनी याचे संकेत दिले आहेत. पण यापाठीमागे आर्थिक गणितांसोबत कायदेशीर बाबीचं कारणही सांगितलं जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील शोच्या शूटिंगमध्ये सुनील शोमध्ये पुन्हा सहभागी होऊ शकतो. पण यासाठी शोच्या निर्मात्यांना सुनीलला जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहेत. सुनील आपलं मानधन वाढवूनच शोमध्ये सहभागी होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळतं आहे.

याशिवाय, सुनील या शोमध्ये सहभागी होण्यापाठीमागे कायदेशीर कारण असल्याचं ही समोर येत आहे. कारण सध्या सुनील कपिलच्या शोच्या कायदेशीर बंधनात आहे. करारानुसार त्यानं शोचं शूटिंग पूर्ण केलं नाही, तर त्यासाठी त्याच्याकडून मोठा दंडही वसूल केला जाऊ शकतो. ते टाळण्यासाठी सुनील शोमध्ये सहभागी होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

वास्तविक, सुनील सध्या ऑफिशियल सुट्टीवर आहे. कपिलसोबतच्या वादापूर्वीच त्याने शोच्या निर्मात्यांना सुट्टीवर जाणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे सुनील शिवायच तीन एपिसोडचं शूटिंग होणार, हे आधीच स्पष्ट होतं. पण कपिल आणि सुनीलमध्ये झालेल्या वादामुळे याला वेगळंच वळण मिळालं.

सुनीलने आपल्या सुट्टीदरम्यान दिल्लीत लाईव्ह परफॉर्मन्स सादर केला होता. शिवाय त्याने इंडियन आयडॉलमध्येही एक स्किट सादर केलं होतं. त्यामुळे त्याची चॅनेलसोबत नाराजी नसल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे मानधन वाढवून तो शोमध्ये काम करण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संबंधित बातम्या

सोनी टीव्हीचं कपिलला एक महिन्यांचं अल्टिमेटम

कपिल शर्माला प्रेक्षकांना 10 मिनिटंही हसवता आलं नाही, शूटिंग रद्द

प्रेक्षकांना हसवताना कपिलची दमछाक, सुनील ग्रोव्हरचा लाईव्ह परफॉर्मन्स हिट

कपिलच्या शोमध्ये ‘नानी’ची ‘घरवापसी’?, सुनील ग्रोव्हरवरुन सस्पेंस कायम

सध्या मी निराश आहे, सुनील ग्रोव्हरचं ट्वीट

एअर इंडिया कपिल शर्मावर कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत

…म्हणून कपिल शर्मा मनोज वाजपेयीसमोर ढसाढसा रडला?

‘द कपिल शर्मा शो’ बंद होण्याची चिन्हं, सुनील ग्रोव्हरचा नवा शो?

कपिल शर्माचा माफीनामा, सुनिल ग्रोव्हरचं उत्तर

कपिलच्या शोवरुन सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात तणाव?

सुनिल ग्रोव्हरसोबतच्या भांडणावर कपिल शर्माची फेसबुक पोस्ट

…म्हणून कपिल शर्मानं विमानातचं सुनिल ग्रोवरला धुतलं

First Published:

Related Stories

अक्कासाहेबांचं 'पुढचं पाऊल' थांबणार... कळ्ळं?
अक्कासाहेबांचं 'पुढचं पाऊल' थांबणार... कळ्ळं?

मुंबई : गेली सहा वर्ष प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणारी ‘स्टार

‘हम पाँच’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
‘हम पाँच’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: एकेकाळी ज्या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं

...म्हणून सुनील ग्रोव्हर छोट्या पडद्यावर पुन्हा परतणार!
...म्हणून सुनील ग्रोव्हर छोट्या पडद्यावर पुन्हा परतणार!

नवी दिल्ली : विनोदवीर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील

'जय मल्हार' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला...
'जय मल्हार' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला...

मुंबई : लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेली ‘झी मराठी’वरील ‘जय

श्वेता तिवारीच्या मृत्यूची बातमी व्हायरल, अफवेवर पतीचं स्पष्टीकरण
श्वेता तिवारीच्या मृत्यूची बातमी व्हायरल, अफवेवर पतीचं स्पष्टीकरण

मुंबई: सोशल मीडियावर अनेकदा अफवाचं पीक पाहायला मिळतं. अगदी 10वी किंवा

व्हिडिओ : प्री वेडिंग शूटसाठी 'तुझ्यात जीव रंगला'च्या गाण्याची क्रेझ
व्हिडिओ : प्री वेडिंग शूटसाठी 'तुझ्यात जीव रंगला'च्या गाण्याची क्रेझ

मुंबई : प्री वेडिंग शूटसाठी लोकं आजकाल काय करतील याचा नेम नाही.

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/05/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/05/2017

1. कुलभूषण जाधव प्रकरणाचा निकाल गुरुवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयात

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर सचिनची फटकेबाजी
'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर सचिनची फटकेबाजी

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चला ‘हवा येऊ द्या’च्या

माझ्या टीव्ही मालिकाही इतर टीव्ही मालिकांसारख्या 'स्टुपिड': एकता कपूर
माझ्या टीव्ही मालिकाही इतर टीव्ही मालिकांसारख्या 'स्टुपिड': एकता...

मुंबई: निर्माती-दिग्दर्शिका एकता कपूरनं आपल्या टीव्ही मालिकेबद्दल

मायकल जॅक्सन ते जस्टिन बिबर, वादांची मालिका
मायकल जॅक्सन ते जस्टिन बिबर, वादांची मालिका

मुंबई: जगप्रसिद्ध पॉपसिंगर जस्टिन बिबरचा आज नवी मुंबईतल्या डी.