'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधली दयाबेन आई बनली!

दिशा वकानीने 24 नोव्हेंबर 2015 रोजी मुंबईतील मयूर पांडासोबत लग्न केलं होतं. ह्या जोडप्याचं हे पहिलंच अपत्य आहे.

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधली दयाबेन आई बनली!

मुंबई : सब टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधली दयाबेन अर्थात दिशा वकानीने गुड न्यूज दिली आहे. दिशा वकानी आई बनली असून तिने मुंबईतील रुग्णालयात मुलीला जन्म दिला आहे.

डॉक्टरांनी दिशाला 20 डिसेंबर ही डिलिव्हरी डेट दिली होती. परंतु 20 दिवस आधीच नन्ही परी दिशाच्या घरी आली.

दिशा वकानीने 24 नोव्हेंबर 2015 रोजी मुंबईतील मयूर पांडासोबत लग्न केलं होतं. ह्या जोडप्याचं हे पहिलंच अपत्य आहे. चिमुकलीच्या आगमनाने दोघेही फार आनंदात आहेत.

प्रेग्नंट असल्याने दिशा शो सोडेल, असं वृत्त होतं. शिवाय 'तारक मेहता का उल्टा चश्मा'चे निर्माते नव्या चेहऱ्याच्या शोधात असल्याचंही म्हटलं जात होतं. परंतु दिशा मालिकेत राहणार असल्याचं निर्माते असित मोदी यांनी स्पष्ट केलं.

गरोदरपणात दिशाच्या सासूने तिची अतिशय काळजी घेतली होती. सासू तिला मालिकेच्या शोच्या सेटवर सोडायला येत असे. दिशाला त्रास होणार नाही, ह्याची काळजीही सासू घेत असे. दिशाची प्रेग्नन्सी पाहता निर्मात्यांनी तिच्यासाठी कामाचे तासही कमी केले होते.

सब टीव्हीवरची 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका प्रेक्षकांमध्ये फारच लोकप्रिय आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही मालिका पाहतात. ही विनोदी मालिका टीआरपीच्या यादीत कायम टॉप-10 मध्येच जागा पटकावते.

टीव्ही-नाटक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah fame actress Dayaben ka Disha Vakani blessed with baby girl
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV