अभिनेता शशांक केतकर पुन्हा बोहल्यावर

शशांक केतकरचं हे दुसरं लग्न आहे.

अभिनेता शशांक केतकर पुन्हा बोहल्यावर

मुंबई : 'होणार सून मी ह्या घरची' फेम टीव्ही अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा लग्नाच्या बोहल्यावर चढला आहे. शशांक केतकर आणि प्रियांका ढवळे यांचा पुण्यात आज विवाहसोहळा पार पडला.

शशांक केतकरचं हे दुसरं लग्न आहे. प्रियांका ढवळे ही व्यवसायाने वकील आहे.

'होणार सून' फेम अभिनेता शशांक केतकरचा साखरपुडा

स्वप्नांच्या पलिकडले, होणार सून मी ह्या घरची, इथेच टाका तंबू यासारख्या मालिकांतून शशांकचा चेहरा घराघरात पोहचला होता. त्याचप्रमाणे शशांकचं ‘गोष्ट तशी गमतीची’ हे नाटक महाराष्ट्रच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांची वाहवा मिळवत होतं. त्याने ‘वन वे तिकीट’ या चित्रपटातही भूमिका साकारली होती.

दोन वर्षांपूर्वी शशांक केतकरचं 'होणार सून..' मालिकेतील त्याची सहकलाकार तेजश्री प्रधानशी लग्न झालं होतं. त्यानंतर वर्षभराच्या कालावधीत दोघं विभक्त झाले.

त्यानंतर शशांकने एप्रिलमध्ये प्रियांका ढवळेशी साखरपुडा केला होता. अखेर आज दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.

श्री-जान्हवीत प्रत्यक्षातही 'का रे दुरावा'! शशांक-तेजश्री घटस्फोटाच्या तयारीत

टीव्ही-नाटक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: TV actor Shashank Ketkar ties knot with Priyanka Dhavle
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV