श्वेता तिवारीच्या मृत्यूची बातमी व्हायरल, अफवेवर पतीचं स्पष्टीकरण

श्वेता तिवारीच्या मृत्यूची बातमी व्हायरल, अफवेवर पतीचं स्पष्टीकरण

मुंबई: सोशल मीडियावर अनेकदा अफवाचं पीक पाहायला मिळतं. अगदी 10वी किंवा 12वी निकालाच्या तारखांपासून ते एखाद्या सेलिब्रिटीच्या मृत्यूपर्यंत. अशा बऱ्याच अफवा सोशल मीडियावर येत असतात. आता याच अफवेला अभिनेत्री श्वेता तिवारी ही देखील बळी पडली आहे.

श्वेता तिवारी हिचा मृत्यू झाल्याची अफवा सध्या व्हायरल होत आहे. या अफवांमुळे त्रस्त होऊन श्वेता तिवारीचा पती अभिनव कोहली याने हे खोडसाळ वृत्त असल्याचं म्हणत आपला संताप व्यक्त केला. 'श्वेताला काहीही झालं नसून ती अगदी ठणठणीत आहे.' असं त्यानं सांगितलं.

शनिवार दिवसभर श्वेता तिवारीचं निधन झाल्याची अफवा व्हायरल झाली होती. याबाबत बोलताना अभिनव म्हणाला की, 'मला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा मी पू्र्णपणे घाबरून गेलो. कारण काही वेळापूर्वीच मी तिच्याशी फोनवर बोललो होतो आणि आता मला असं समजतं आहे. मी तिला लागलीच फोन केला. तेव्हा ठीक असल्याचं तिने सांगितलं.'

या अफवेबाबत श्वेता तिवारी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. यापूर्वीही आपल्याबाबत अशीच अफवा पसरवण्यात आल्याचं तिनं म्हटलं आहे.

टीव्ही-नाटक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV