कॉम्प्रोमाईज करणार का? व्हॉट्सअॅपवर अभिनेत्रीचं उत्तर...

सुलग्‍ना चॅटर्जी 'दिल से दी दुआ... सौभाग्‍यवती भव:' (2011) आणि रोमँटिक कॉमेडी फिल्‍म पुणे टीसी (2012) मध्ये झळकली होती.

कॉम्प्रोमाईज करणार का? व्हॉट्सअॅपवर अभिनेत्रीचं उत्तर...

मुंबई : मनोरंजन विश्वातील कास्टिंग काऊचविषयी अनेक अभिनेत्री मोकळेपणाने बोलत आहेत. चित्रपट, टीव्ही इंडस्ट्री, मॉडेलिंग अशा सर्वच ठिकाणी हे प्रकार सुरु असल्याचं म्हटलं जातं. टीव्ही अभिनेत्री सुलग्ना चॅटर्जीने आपल्याला आलेली 'कॉम्प्रोमाईज'ची ऑफर धुडकावल्याचं सांगितलं आहे.

सुलग्‍ना चॅटर्जी 'दिल से दी दुआ... सौभाग्‍यवती भव:' (2011) आणि रोमँटिक कॉमेडी फिल्‍म पुणे टीसी (2012) मध्ये झळकली होती.

व्हॉट्सअॅपवर तिला एका व्यक्तीने कॉम्प्रोमाईज करण्याची अर्थात अनैतिक संबंध ठेवण्याविषयी विचारणा केली. तिने तात्काळ त्याची मागणी धुडकावून लावताच, माझी नाही दिग्दर्शकाची इच्छा असल्याचं सांगितलं. तरीही सुलग्ना आपल्या निर्णयावर ठाम राहिली.When such offers are so common that you are not even affected anymore!


A post shared by Sulagna Chatterjee (@suluclicks) on


सुलग्नाने या चॅटचा स्क्रीनशॉट काढून इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. अर्थात तिने या व्यक्तीची ओळख उघड केलेली नाही. 'अशा प्रकारच्या ऑफर्स इतक्या कॉमन होतात, की तुम्हाला त्यामुळे फरक पडेनासा होतो' असं कॅप्शन तिने फोटोला दिलं आहे. सुलग्नाच्या निर्णयाचं सोशल मीडियावर चाहत्यांनी कौतुक केलं आहे.

टीव्ही-नाटक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: TV Actress Sulagna Chaterjee gets offer to compromise on Whatsapp latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV