नॅशनल क्रश प्रिया वारियर चक्क मराठी नाटकात?

‘गुलाबी गोंधळ’ या नाटकाचं पोस्टर सध्या चांगलंच चर्चेत आहे. कारण या नाटकाच्या पोस्टरवर चक्क प्रिया वारियरचा फोटो छापला आहे. हो तीच प्रिया जीने गेल्या दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

नॅशनल क्रश प्रिया वारियर चक्क मराठी नाटकात?

मुंबई : ‘गुलाबी गोंधळ’ या नाटकाचं पोस्टर सध्या चांगलंच चर्चेत आहे. कारण या नाटकाच्या पोस्टरवर चक्क प्रिया वारियरचा फोटो छापला आहे. हो तीच प्रिया जीने गेल्या दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

आता त्या प्रियाचा फोटो मराठी नाटकाच्या पोस्टरवर बघून तुमचा ‘गुलाबी गोंधळ’ उडू शकतो. कदाचित ‘ती’ प्रिया मराठी नाटक करतेय का असा प्रश्नही पडू शकतो. पण थोडं थांबा. कारण ‘त्या’ प्रियाचा आणि  या नाटकाचा तसा काहीच संबंध नाही. मग तुम्ही विचाराल मग हा फोटोचा सावळा गोंधळ कशासाठी? तर याचं उत्तर आहे अर्थातच पब्लिसिटीसाठी.

मराठी नाटक बघायला प्रेक्षक येत नाहीच, मग त्यांनी किमान जाहिरात तरी बघावी म्हणून हा फोटो प्रपंच असं म्हणत आहेत. या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक जनार्दन लवंगारे. प्रिया वारियर सध्या भलतीच चर्चेत आहे. त्या चर्चेचा या नाटकाला थोडा फार फायदा झाला तरी पूरे या सरळ सरळ हिशोबाने प्रियाला पोस्टरवर स्थान देण्यात आलं आहे.

नाटकाचं पोस्टर :

Gulabi gondhal priya varrier

थोडक्यात काय तर पब्लिसिटीसाठी वाट्टेल ते. मात्र याने या नाटकाला कितपत फायदा होतो ते लवकरच कळेल.

टीव्ही-नाटक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: viral girl priya warrier on marathi dramas poster latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV