पालघरमधील तब्बल 123 शाळा बंद, जिल्हा परिषदेचा निर्णय

पालघर जिल्हा परिषदेने 123 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या 123 शाळांमधील 2 हजार 442 विद्यार्थ्यांना आता आपापल्या गावांच्या शेजारील गावातील शाळेत शिकायला जावं लागणार आहे.

123 ZP schools closed in Palghar latest updates

पालघर : पालघर जिल्हा परिषदेने 123 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या 123 शाळांमधील 2 हजार 442 विद्यार्थ्यांना आता आपापल्या गावांच्या शेजारील गावातील शाळेत शिकायला जावं लागणार आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या निर्णयाचा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. जिल्हापरिषदेच्या या निर्णयाला आता पालकांकडून विरोध होऊ लागला आहे.

ज्या शाळांमध्येत 30 पेक्षा कमी पटसंख्या आणि एक किलो मीटरच्या आतील शाळा बंद करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले यांनी दिली.

एवढ्या मोठ्या संख्येने शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे लाखो रुपये खर्च करुन उभारलेल्या 123 शाळा ओस पडणार आहेत. शासनाने कोट्यावधी रुपये खर्च केलेला निधी वाया जाणार आहे.  तर प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांना ये-जा करण्यास मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. शिवाय, ग्रामीण भाग असल्याने विद्यार्थी तसेच पालकांना अडचणींना सामोरे जाव लागणार असल्याने पालकांकडून या समायोजनाला विरोध होऊ लागला आहे.

ग्रामीण भागातील आदिवासी जनता शिक्षणाकडे वळावी, यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे. कोट्यावधी रुपये खर्चही करत आहे. मात्र आता याच 123 शाळा बंद केल्याने पहिली ते चौथीपर्यंत शिकणारे लहान विद्यार्थी शेजारील गावातील शाळेत हजेरी लावतीलच, हे सांगणं कठीण आहे. कारण मुलांना येण्या-जाण्यास मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:123 ZP schools closed in Palghar latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून 700 अपघातग्रस्तांना जीवदान
व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून 700 अपघातग्रस्तांना जीवदान

रायगड : बहुतांश व्हॉट्सअॅप ग्रुपवर मित्र-मैत्रिणींच्या गप्पा,

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून औरंगाबादेतील दोघांचा मृत्यू
उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून औरंगाबादेतील दोघांचा मृत्यू

औरंगाबाद : बद्रीनाथहून ऋषिकेशला येत असताना महाराष्ट्रातील

छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र : आव्हाड
छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र : आव्हाड

मुंबई : साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयन राजे यांना

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/07/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/07/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/07/2017   मान्सून जुलैअखेर 10

मुंबई-गोवा हायवेवर खड्डेच खड्डे, लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात
मुंबई-गोवा हायवेवर खड्डेच खड्डे, लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात

रायगड : हो असा… आपलो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17.. हयसर खड्डे शोधूक

मान्सून जुलैअखेर 10 दिवसांसाठी ब्रेक घेणार
मान्सून जुलैअखेर 10 दिवसांसाठी ब्रेक घेणार

मुंबई: सध्या सर्वदूर पाऊस कोसळत असला, तरी लवकरच तो ब्रेक घेण्याचा

राष्ट्रपती निवडणुकीत नगरमधील 2 आमदार फुटले : सत्यजीत तांबे
राष्ट्रपती निवडणुकीत नगरमधील 2 आमदार फुटले : सत्यजीत तांबे

मुंबई: राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी

कोल्हापुरात पुरात अडकलेल्या अडीचशे प्रवाशांची सुटका
कोल्हापुरात पुरात अडकलेल्या अडीचशे प्रवाशांची सुटका

कोल्हापूर: कोल्हापुरातल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या 5 खासगी

बारामतीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या
बारामतीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

पुणे : बारामतीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका

'काऊ बॉय ऑफ सोलापूर, आयुष्यभर घोड्यावरुन प्रवास करणारा अवलिया
'काऊ बॉय ऑफ सोलापूर, आयुष्यभर घोड्यावरुन प्रवास करणारा अवलिया

सोलापूर:  काऊ बॉय ऑफ सोलापूर..अर्जुन कदम.. वय… फक्त 90.. कदमांच्या