प्रवाशांचं सोंग घेऊन खासगी टॅक्सीचालकांना लुटणारी टोळी जेरबंद

By: अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे | Last Updated: Friday, 21 April 2017 8:02 PM
प्रवाशांचं सोंग घेऊन खासगी टॅक्सीचालकांना लुटणारी टोळी जेरबंद

ठाणे : प्रवाशांचं सोंग घेऊन ओला, उबेरसारख्या खासगी टॅक्सी चालकांना लुटणाऱ्या टोळीला ठाणे पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील आरोपींमध्ये दोनजण सराईत गुन्हेगार असून, दोन कॉलेज विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

ही टोळी प्रवाशांचं सोंग घेऊन टॅक्सीत बसत. टॅक्सी निर्जन स्थळी येताच चाकुचा धाक दाखवून चालकाकडील किमती ऐवज लुटून पळ काढत.

काही दिवसांपूर्वी या चारही आरोपींनी विमलेश गुप्ता नावाच्या टॅक्सीचालकावर हल्ला करून पोबारा केला होता. त्याप्रकरणी ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवत आरोपींना अटक केली.

या प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय उगवेकरवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या चौघांना अटक करुन पोलिसांनी न्यायालया समोर उभे केले असता, न्यायालयाने त्या चौघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

First Published: Friday, 21 April 2017 8:01 PM

Related Stories

टाकाऊ प्लास्टिकपासून रस्ता, राहुरीतल्या कृषी विद्यापीठाचा प्रकल्प
टाकाऊ प्लास्टिकपासून रस्ता, राहुरीतल्या कृषी विद्यापीठाचा...

राहुरी (अहमदनगर) : टाकाऊ प्लास्टिकपासून राहुरी येथील महात्मा फुले

जीएसटीमुळे मुंबईच्या सुरक्षेशी तडजोड नाही : मुनगंटीवार
जीएसटीमुळे मुंबईच्या सुरक्षेशी तडजोड नाही : मुनगंटीवार

मुंबई : जीएसटीच्या मंजुरीसाठी राज्य सरकारचं तीन दिवसीय अधिवेशन

आयपीएलमध्ये पुन्हा फिक्सिंग?, गुजरात लायन्सच्या 2 खेळाडूंच्या चौकशीची शक्यता
आयपीएलमध्ये पुन्हा फिक्सिंग?, गुजरात लायन्सच्या 2 खेळाडूंच्या...

नवी दिल्ली: आयपीएलच्या या मोसमालाही आता मॅच फिक्सिंगचं ग्रहण

गर्लफ्रेण्डला मुंबईत थांबवण्यासाठी ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याचा फेक कॉल
गर्लफ्रेण्डला मुंबईत थांबवण्यासाठी ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याचा...

मुंबई : प्रेमात वेडापिसा झालेल्या तरुणाने आपल्या गर्लफ्रेण्डसाठी

मुंबईत कॅश कलेक्शन करणाऱ्या दोन तरुणांकडून बनावट दरोडा
मुंबईत कॅश कलेक्शन करणाऱ्या दोन तरुणांकडून बनावट दरोडा

मुंबई : मुंबईत कॅश कलेक्शन करणाऱ्या दोन तरुणांनी 12 लाखांची रोकड

आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या चौघांना अटक
आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या चौघांना अटक

नवी मुंबई : आयपीएल मॅचवर सट्टा खेळणाऱ्या चौघांना नवी मुंबई

सरकारला 7 कंपन्यांच्या शेअर विक्रीतून 35 हजार कोटींची कमाई!
सरकारला 7 कंपन्यांच्या शेअर विक्रीतून 35 हजार कोटींची कमाई!

मुंबई : एनटीपीसी आणि इंडियन ऑईलसोबत एकूण सात सरकारी कंपन्या आपले

तामिळनाडूत 'जलीकट्टू' दोघांच्या जीवावर, 70 जण जखमी
तामिळनाडूत 'जलीकट्टू' दोघांच्या जीवावर, 70 जण जखमी

नवी दिल्ली : ‘जलीकट्टू’च्या खेळात आणखी दोन जणांचा मृत्यू झाला

आता मराठा समाजाचा अर्धनग्न मोर्चा, तारीख जाहीर!
आता मराठा समाजाचा अर्धनग्न मोर्चा, तारीख जाहीर!

पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी 10 मे रोजी पुण्यात

धुळ्यात ट्रक-सुमोचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू
धुळ्यात ट्रक-सुमोचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

धुळे : धुळे जिल्ह्यातील मुकटी येथे ट्रक आणि सुमोचा अपघात होऊन 5