विराटसोबत वर्ल्डकपमध्ये खेळलेला सहकारी सध्या छोले भटुरे विकतो!

13 Nov 2017 11:42 PM

भारत क्रिकेटची अक्षरश: पूजा केली जाते. इथे क्रिकेटर म्हणजे देव समजला जातो. जोपर्यंत क्रिकेटपटूचा फॉर्म आहे, तोवर त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळली जातात, मात्र फॉर्म हरवल्यानंतर ना तुम्हाला कोणी लक्षात ठेवतं, ना तुमचं कोणी कौतुक करतं.

क्रिकेट टीममध्ये स्थान मिळालं नाही तर क्रिकेटपटूंवर कोणती वेळ येऊ शकते हे सांगता येत नाही.

अंडर 19 वर्ल्डकपमध्ये 2008 साली विराट कोहलीच्या विश्वविजयी संघात खेळलेल्या एका खेळाडूवर अशीच वाईट वेळ आली आहे. विश्वविजेत्या संघातील या खेळाडूला जगण्यासाठी सध्या रस्त्यावर छोले-भटुरे विकावं लागत आहे.

पेरी गोयल असं या खेळाडूचं नाव आहे. सध्या पेरी गोयलचे छोले भटुरे विकणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV