नवी दिल्ली : 2G घोटाळ्यावरील निकाल म्हणजे माझ्याविरोधातील दुष्प्रचाराला उत्तर - मनमोहन सिंह

21 Dec 2017 03:24 PM

देशाच्या तिजोरीला 1 लाख 76 हजार कोटींचा फटका देणाऱ्या 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सीबीआयच्या पहिल्या खटल्यात सर्व आरोपी निर्दोष सुटले आहेत. दिल्लीतील सीबीआय कोर्टाने आज यासंदर्भात निर्णय दिला.

2G स्पेक्ट्रम घोटाळ्यासंदर्भात एकूण तीन खटले सुरु आहेत. त्यापैकी दोन सीबीआयच्या कोर्टात, तर तिसरा अंमलबजावणी संचलनालयाकडे आहे. त्यापैकी सीबीआय कोर्टाने आज माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्याशी संबंधित खटल्यावर निर्णय दिला.

LATEST VIDEOS

LiveTV