नवी दिल्ली : तोंडी तलाक देणाऱ्यास तीन वर्षांचा कारावास, तिहेरी तलाक कायद्याचा मसुदा तयार

01 Dec 2017 11:24 PM

यापुढे तिहेरी तलाक दिल्यास 3 वर्षांचा कारावास भोगावा लागेल. सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसार केंद्र सरकानं नव्या कायद्याचा मसुदा तयार केला. हिवाळी अधिवेशनात संसदेत तो मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. या विधेयकानुसार, तोंडी तिहेरी तलाक देणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार असून हा अजामीनपात्र गुन्हाही असणार आहे. मात्र कायदा जम्मू-काश्मीरमध्ये लागू होणार नाही.

LATEST VIDEOS

LiveTV